खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेने देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. या पदयात्रेला सर्व जाती-धर्माच्या लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेची दखल भाजपा व आरएसएसला घ्यावी लागत आहे. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या उपस्थितीत लाइट कॉम्बॅट हेलीकॉप्टर वायुसेनेला सुपूर्द करण्याच्या जोधपूर येथील कार्यक्रमात सर्व धर्माच्या पंडितांकडून प्रार्थना करण्यात आली. …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, राज्याच्या आरोग्य क्षेत्रासाठी दुप्पट निधी देणार राज्यभर ७०० ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करणार
राज्याची ग्रामीण आरोग्य यंत्रणा बळकट करण्याला आमचे सर्वोच्च प्राधान्य असून, आरोग्य क्षेत्रासाठी दुप्पट निधी देणार आहे’ अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एनडीटिव्ही वृत्तवाहिनीच्या ‘स्वस्थ बनेगा इंडिया’ या कार्यक्रमात दिली. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे, राज्यभर सुमारे ७०० ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करणे, बाल आरोग्यावर विशेष लक्ष …
Read More »नारायण राणे यांची घोषणा, महात्मा गांधीजींच्या जीवनपटावर आधारित स्मारक उभारणार एमगिरी येथे सेवाग्राम औद्योगिक महोत्सवाचे उद्घाटन
वर्धा ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची कर्मभूमी आहे. या कर्मभूमीत त्यांच्या जीवनकार्यावर आधारित भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज येथे केली. महात्मा गांधी औद्योगिकरण संस्थान (एमगिरी) येथे तीन दिवसीय सेवाग्राम औद्योगिक महोत्सव प्रदर्शन, विक्री आणि कार्यशाळेचे उद्घाटन राणे यांच्या हस्ते …
Read More »महात्मा गांधी यांचे विचार कृतीत आणण्यासाठी शासन प्रयत्नशील राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याचा समारोप
सर्वसामान्य माणसाला स्वातंत्र्य लढ्याशी जोडून बापूजींनी तो लढा खऱ्या अर्थाने एका मोठया जनांदोलनात परावर्तित केला. बापूजी सर्वसामान्य माणसाच्या सेवेला ईशसेवा – देशसेवा मानत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपित्याचे विचार कृतीत आणण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू केले आहेत. समाजातल्या प्रत्येक वर्गासाठी जाणिवेने काम केले जात आहे म्हणून राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता …
Read More »घोषणाबाजीवर दिपक केसरकर संतापून सुप्रिया सुळेंसमोरच म्हणाले, होणार नाही.. शिक्षण संस्था चालकांनाच सुनावले
ऐरवी फक्त शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवरून आक्रमकपणे टीका करणारे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी तसे इतरवेळी शांत असल्याचे अनेकवेळा राज्यात दिसून आले. मात्र आज सांगली येथे झालेल्या कार्यक्रमात शालेय शिक्षण मंत्री केसरकर हे पुन्हा एकदा संतापलेले दिसले आणि संतापाच्या भरातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर …
Read More »मुख्यमंत्री शिंदेंचे बांधकाम व्यावसायिकांना आवाहन, घराच्या किंमती परवडणाऱ्या ठेवा 'नारेडेको' च्या प्रदर्शनाचा समारोप
परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी केंद्र आणि राज्य शासन विविध योजना राबवित आहे. सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी खासगी क्षेत्रातील बांधकाम व्यावसायिकांनी पुढाकार घेऊन परवडणाऱ्या किंमती ठेवाव्यात, याकरिता बांधकाम क्षेत्राने पुढे येण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. ‘नारेडेको’ म्हणजे नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलतर्फे आयोजित प्रॉपर्टी एक्स्पो २०२२ मुख्यमंत्री …
Read More »मिळालेल्या धमकीवरून एकनाथ शिंदे म्हणाले, या धमक्यांचा माझ्यावर परिणाम… मी जनतेतला माणूस मला कोणीही रोखू शकणार नाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची घटना सकाळी उघडकीस आली. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. या धमकी नाट्यामागे नक्षलवादी असल्याचे सांगण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनीही चिंता व्यक्त केली. मात्र याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून शिंदे म्हणाले, …
Read More »शिंदे गटाच्या खासदारापाठोपाठ आशिष शेलार म्हणाले, सचिन वाझे ठाकरेंचा माणूस कागदोपत्री सिध्द झाले आहे
शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करत म्हणाले की, ‘मातोश्री’वर दर महिन्याला १०० खोके पाठवले जात होते. ते बुलढाण्यातील शिंदे गटाच्यावतीने आयोजित ‘हिंदू गर्व गर्जना’ कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली असून सचिन वाझे हे दर महिन्याला मातोश्रीवर १०० कोटी …
Read More »‘धन्यवाद मोदीजी’ अभियानाचा शुभारंभ पंतप्रधान मोदी यांना राज्यातून पंधरा लाख लाभार्थ्यांची आभाराची पत्रे पाठविणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य लोकांसाठी केलेल्या योजनांचा लाभ झालेल्या राज्यातील लाभार्थ्यांशी संपर्क साधून त्यांच्या हस्ताक्षरात लिहिलेली पंधरा लाख पत्रे पंतप्रधानांपर्यंत पोहचविण्याचे भारतीय जनता पार्टीचे ‘धन्यवाद, मोदीजी’ अभियान रविवारी सुरू झाले. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या अभियानात मुंबईत गोरेगाव मतदारसंघात पन्नास लाभार्थ्यांशी संपर्क साधला. बावनकुळे यांनी पत्रकारांना अभियानाची माहिती दिली. …
Read More »नाना पटोलेंचा टोला, ‘भारत जोडो’ यात्रेच्या प्रचंड प्रतिसादाने भाजपाचे संतुलन बिघडले भाजपाच्या टीकेचा ‘भारत जोडो’ यात्रेवर काहीही फरक पडत नाही
काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून भारतीय जनता पक्षाचे नेते बिथरले आहेत. भाजपाच्या नेत्यांचे संतुलन बिघडले असून त्याच निराश मानसिकतेतून पदयात्रेवर टीका केली जात आहे. परंतु भाजपाच्या या टीकेचा पदयात्रेवर तसूभरही परिणाम होणार नसून ही पदयात्रा जनतेच्या अभूतपूर्व प्रतिसादासह काश्मीरपर्यंत मार्गक्रमण करत …
Read More »
Marathi e-Batmya