Editor

मुख्यमंत्री शिंदेची घोषणा, अण्णाभाऊ साठेंचे नाव भारतरत्न पुरस्कारासाठी पाठविणार साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधणार

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या माध्यमातून या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार असून विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक योजना, या समाजघटकासाठी विनातारण कर्ज योजना राबवणार, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा यासाठी शासन स्वतः केंद्राकडे शिफारस करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. चेंबूर येथील फाईन आर्टस् …

Read More »

आयटीआय प्रवेशासाठी २७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ नव्याने ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे व प्रवेश अर्ज निश्चित

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) प्रवेशाकरीता २७ ऑगस्ट २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, मुंबई विभागातील इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांनी त्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रदीप दुर्गे यांनी केले आहे. मुंबई विभागाच्यावतीने मुलुंड आयटीआय येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मुंबई विभाग सहसंचालक यांच्यावतीने दुर्गे …

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध स्पर्धा परीक्षांच्या पध्दतीमध्ये केल्या ‘या’ सुधारणा गुणवत्ता राखण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासन सेवेतील विविध संवर्गाकरीता राबविण्यात येणाऱ्या विद्यमान ‘भरतीप्रक्रियेमुळे परीक्षांची वाढलेली संख्या, उमेदवार व प्रशासकीय यंत्रणेवर येणारा ताण, भरतीप्रक्रियेस होणारा विलंब, गुणवत्ता राखण्यासाठी सतत करावे लागणारे प्रयत्न, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन करावयाच्या विविध उपाययोजना, भविष्यामधील भरतीप्रक्रियेचे नियोजन या व इतर अनुषंगिक बाबींचा साकल्याने विचार करुन आयोगामार्फत आयोजित विविध …

Read More »

अण्णा भाऊ साठे यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाबाबत राज्य शासन कमी पडणार नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाबाबत राज्य शासन कमी पडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चेंबूर येथे उद्यानातील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.त्यावेळी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री …

Read More »

अखेर राज्यपाल कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या जनतेकडे मागितली माफी राज्यपाल कोश्यारी यांनी क्षमा करण्याची राज्यातील जनतेला विनंती

दोनच दिवसांपूर्वी अंधेरी येथील रस्त्याचे नामकरण सोहळ्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबई आणि ठाणे येथून गुजराती-राजस्थानी बाहेर काढले तर इथे पैसाच राहणार नाही. तसेच मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हणणार नाही असे वादग्रस्त विधान केले. त्यानंतर भाजपा आणि बंडखोर एकनाथ शिंदे गट वगळता सर्वच राजकिय पक्षांनी तीव्र शब्दात राज्यपालांच्या या वक्तव्याचा …

Read More »

संजय राऊत यांना मध्यरात्री अटक, तर दिवसा कोठडी ईडी न्यायालयाने घरच्या जेवणास आणि रात्री १०.३० नंतर चौकशी करण्यास मनाई

गोरेगांव येथील पत्रावाला चाळ प्रकरणात शिवसेना प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांची काल दिवसभर त्यांच्या घरी आणि संध्याकाळपासून मध्यरात्री पर्यंत ईडी कार्यालयात चौकशी केली. त्यानंतर संजय राऊत यांना मध्यरात्रीनंतर ईडीने अटक केली. त्यानंतर संजय राऊत यांना ईडी न्यायालयात हजर करण्यात आले असता अखेर न्यायालयाने संजय राऊत यांनी ४ ऑगस्ट पर्यंत …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाठविणार राज्यातील प्रत्येक लाभार्थ्यास पत्र केंद्र-राज्याच्या योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवा

नव्या सरकारकडून प्रधानमंत्र्यांनी देखील मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. विशेषत: केंद्र आणि राज्य भागीदारीच्या योजना अगदी शेवटच्या घटकांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. त्यामुळे सरकार म्हणून नागरिकांपर्यंत पोहोचवा, आपली कार्यक्षमता वाढवतांना एकमेकांमध्ये समन्वय ठेवावा. तसेच योजनांमध्ये लोकांचाही सहभाग वाढवावा, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. राज्यातील …

Read More »

उध्दव ठाकरे म्हणाले, आताच्या सत्ताधाऱ्यांनी बढाया मारू नये नाही तर अवस्था… सत्तेचा फेस गेल्यानंतर सगळं स्पष्ट होईल

देशात ६०-६५ वर्षे काँग्रेस सत्तेवर होती. मात्र आजची त्यांची अवस्था पाहिली की आताच्या सत्ताधाऱ्यांनी बढाया मारू नये असा खोचक टोला भाजपासह बंडखोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावत जे हमाम मे… म्हणून सगळे तिकडे गेलेत. त्या सर्वांच्या शरीरावर सत्तेचा जो फेस आहे तो निघून गेल्यानंतर सगळं स्पष्ट होईल असा इशाराही शिवसेना …

Read More »

नव्या सरकार मध्ये माहिती व जनसंपर्क विभागाच्या गाड्यांच्या पेट्रोल-डिझेलचे झाले वांदे पैसेच मिळेनासे झाल्याने १५ दिवसाहून १४ गाड्या बंद

राज्यात सत्तांतर होत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थानापन्न होवून एक महिना झाला. मात्र राज्याचा गाडा चालविण्यासाठी मंत्रिमंडळ विस्तारच न झाल्याने या सरकारच्या प्रसिध्दीचे काम पाहणाऱ्या माहिती व जनसंपर्क विभागाला आवश्यक तो निधी मिळेनासा झाला. त्यामुळे या विभागाच्या गाड्यांचे पेट्रोल-डिझेलचेही वांदे होवू लागल्याची धक्कादायक माहिती पुढे …

Read More »

अर्जून खोतकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मंत्री दानवे म्हणाले, त्यांनी विधानसभा… ती जागा भाजपाचीच

मागील काही वर्षात जालना आणि औरंगाबादेतील सत्ता संघर्षावरून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जून खोतकर हे आमने-सामने आले. मात्र आता अर्जून खोतकर यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागल्यानंतर दिल्लीला जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांच्या उपस्थितीत दानवे यांच्याबरोबर समझौता केला. तसेच एकनाथ शिंदे गटात प्रवेशही केला. …

Read More »