नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी नैसर्गिक वायुवरील करात थेट १०.५० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला. तसेच या निर्णयाची अंमलबजावणी १ एप्रिलपासून करणार असल्याची घोषणा केली. त्यानुसार यासंदर्भातील आदेश जारी करत आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरु झाली असून मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या दरात …
Read More »स्वतःच्या डिग्रीचा पत्ता नाही, तेच आता विद्यार्थ्यांना परिक्षेबद्दल मार्गदर्शन करतायत पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘महागाई पे चर्चा’ कधी करणार?
महागाई, ढासळती अर्थव्यवस्था, बेरोजगारीसह देशात ज्वलंत प्रश्न असताना त्यावर लक्ष देण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेळ नाही. जनता महागाईने होरपळत आहे, तरुण वर्ग बेरोजगारीने त्रस्त आहे, शेतकरी, कामगारांचे प्रश्न आहेत त्यावर पंतप्रधान बोलत नाहीत. ‘चाय पे चर्चा’, ‘परिक्षा पे चर्चा’ करणारे पंतप्रधान मोदी ‘महागाई पे चर्चा’ कधी करणार? असा प्रश्न …
Read More »५००० रूपयापर्यंतच्या वैद्यकीय चाचण्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना मोफत, अन्य महत्वाचे मंत्रिमंडळ निर्णय राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतील हे महत्वाचे निर्णय
राज्यातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी राज्यातील ४० ते ५० वर्ष या वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची दोन वर्षातून एकदा तर ५१ व त्यावरील वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची दरवर्षी वैद्यकीय तपासणी करण्याचा आणि त्यासाठी ५ हजार रुपये इतकी रक्कम प्रतिपूर्ती म्हणून देण्याचा निर्णय …
Read More »राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणखी एक पाडवा भेटः वाहतूक भत्त्यात वाढ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला निर्णय
नुकतेच केंद्र सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठीच्या महागाई भत्यात ३ टक्क्याने वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज्य सरकारनेही सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्याने वाढ करण्याचा निर्णय घेत गुढी पाडव्याची भेट शासकीय कर्मचाऱ्यांना दिली. त्यानंतर आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रवासी वाहतूक भत्यातही वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या …
Read More »राज्य सरकारचे वराती मागून घोडे, हाफकीनमधील कोवॅक्सिन लस उत्पादनाला वेग देणार कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर लस उत्पादनाबाबतचा विचार
साधारणतः वर्षभरापूर्वी मुंबईतील हाफकिन इस्टीट्युटमधून कोविडवरील लसीची निर्मिती करण्याबाबतच्या प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजूरी दिली. त्यानंतर कोविड लस निर्माण कऱणाऱ्या कोवॅक्सीन कंपनीसोबत राज्य सरकारने सामंज्यस करारही करण्यात आला. मात्र त्यानंतर कोणतीही हालचाल झाली नाही की केंद्र सरकारकडून निधी दिला गेला ना कोव्हॅक्सीनकडूनही कोणती हालचाल झाली. त्यानंतर सगळंच शांत झालं. …
Read More »बैलगाडा शर्यतींमधले खटले मागे घेणार, पण या अटीनुसारच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला निर्णय
राज्यात कोरोना काळात निर्बंध असतानाही बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्यामुळे दाखल झालेले खटले मागे घेण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. निर्बंध असतानाही भाजपाच्या गोपीचंद पडळकर यांनी सांगलीत बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. तर मावळ आणि दस्तुरखुद्द गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या मतदारसंघ असलेल्या आंबेगाव येथेही शिवसेनेकडून बैलगाडा शर्यतीचे आयोजन …
Read More »मेट्रोच्या विलंबाबद्दल मुंबईकरांची माफी मागा भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची मागणी
येत्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईतील मेट्रो रेल्वेच्या २ ए आणि मेट्रो ७ या टप्प्यांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारे उद्घाटन म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या आहेत. या प्रकल्पाचे ६० टक्क्यांहून अधिक काम देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळात पूर्ण झाले असतानाही मुंबईकरांना वेठीस धरूने उर्वरित कामास तब्बल तीन वर्षे विलंब लावल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांची …
Read More »परिवहन मंत्री परब यांची घोषणा, एसटी महामंडळाच्या संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरु ११ हजार कर्मचारी कंत्राटीवर घेणार
राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्यासाठी देण्यात आलेली मुदत आज संपत आल्याच्या पार्श्नभूमीवर जे कर्मचारी कामावर हजर झाले नाहीत अशा कर्मचाऱ्यांवर उद्यापासून बडतर्फी, सेवा समाप्ती आणि निलंबनाच्या कारवाईला धडक सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री यांनी दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. आज संध्याकाळ किंवा …
Read More »मुख्यमंत्री ठाकरेंच्या हस्ते भूमिपूजन होणाऱे “मराठी भाषा भवन” असे असणार उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुढीपाडव्याला मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते मराठी भाषा भवन, मुख्य केंद्र या इमारतीचे भूमिपूजन मराठी नववर्ष दिनी गुढीपाडव्याला ( २ एप्रिल २०२२) सकाळी अकरा वाजता होणार आहे. जवाहर बालभवन चर्नी रोड येथे होत असलेल्या या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मराठी भाषामंत्री सुभाष देसाई, मुंबई शहरचे …
Read More »गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, “सर्व निर्बंध मागे, पण मास्क घाला..” मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले आवाहन
गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात. जुनं ते मागे सारुन नवीन कार्याचा प्रारंभ करणारा हा दिवस. गेल्या दोन वर्षापासून आपण कोरोनाच्या भयंकर विषाणूचा यशस्वीरित्या मुकाबला केला आणि आज हे सावट दूर होताना दिसते. एक नवीन सुरुवात करण्यासाठी म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये कोरोना काळात लावण्यात आलेले निर्बंध गुढीपाडव्यापासून (२ …
Read More »
Marathi e-Batmya