Editor

लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी लवकरच…पण १ फेब्रुवारीपासून नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्याच्या उद्देशाने सर्वसामान्य मुंबईकरांना मागील १० महिन्यापासून लोकलने प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली. मात्र आता ही बंदी लवकरच उठविण्यात येणार असून याबाबतचा निर्णय लवकरच सर्वांसाठी सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले. मात्र लोकल सेवा सर्वांसाठी १ फेब्रुवारी २०२१ पासून सुरू करण्यात …

Read More »

डाव्यांच्या कष्टकऱ्यांच्या जीवावर काँग्रेस-राष्ट्रवादीचा स्वतंत्र अजेंडा आझाद मैदानावर दोन्ही पक्षांचे मर्यादीत कार्यकर्त्ये हजर

मुंबईः विशेष प्रतिनिधी केंद्राच्या कृषी कायद्याच्या विरोधात डाव्या पक्षांच्या जवळपास सर्वच संघटनांनी एकत्रित येत मोर्चा काढला. या मोर्चात आदिवासी, कातकरी आणि शेतमजूरांचा मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले. मात्र या मोर्चाचे सारे श्रेय मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी स्वतःचे फारसे कार्यकर्त्ये न आणता श्रेय लाटल्याचे चित्र आजच्या सर्वच घटनांवरून दिसून येत …

Read More »

पवारांच्या टोल्यानंतर राज्यपाल भवनाकडून स्पष्टीकरण म्हणे मोर्चेकऱ्यांना आधीच कळविले होते

मुंबईः प्रतिनिधी डाव्या संघटनांच्या नेतृत्वाखाली कामगार-शेतकऱ्यांनी काढलेल्या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यपालांना अभिनेत्री कंगणाला भेटायला वेळ आहे. मात्र शेतकऱ्यांना भेटण्यास वेळ नसल्याचा टोला लगाविल्यानंतर लगेचच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी याबाबत तात्काळ खुलासा करत आपण गोवा विधानसभेच्या पहिल्या सत्राला संबोधित करण्यास जाणार असल्याची माहिती यापूर्वीच मोर्चेकऱ्यांना दिल्याचे एका …

Read More »

सात-बारा (७/१२) भांडवलदारांच्या नावावर करण्याचा मोदींचा डाव ! आझाद मैदानातील शेतकऱ्यांचा एल्गार देशाला दिशा देणारा ठरेल: बाळासाहेब थोरात

मुंबईः प्रतिनिधी केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत दोन महिन्यांपासून सुरु असलेले आंदोलन इतिहास घडवणारे आहे. या कायद्याविरोधात पंजाब हरियाणातील शेतकरी रस्त्यावर उतरल्यानंतर कडाक्याच्या थंडीत मोदी सरकारने शेतकऱ्यांवर थंड पाण्याचा मारा केला तरिही शेतकरी मागे हटला नाही. आझाद मैदानातील हा एल्गार दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची ताकद वाढवणारा ठरणार असून तो देशाला दिशा …

Read More »

राज्यपालांना कंगणाला भेटायला वेळ आहे पण शेतकऱ्यांसाठी नाही शरद पवारांचा राज्यपालांना टोला

मुंबईः विशेष प्रतिनिधी केंद्राच्या कृषी कायद्याच्या विरोधात राज्यातल्या शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. परंतु राज्यपाल गोव्याला गेले असून त्यांना कंगणाला भेटायला वेळ आहे. मात्र माझ्या शेतकऱ्याला भेटायला वेळ नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी करत शेतकऱ्यांना भेटायला वेळ नसल्याचा टोला लगावला. संयुक्त शेतकरी-कामगार मोर्चाला संबोधित करताना ते बोलत होते. महाराष्ट्राच्या …

Read More »

पवारांचा सवाल, देशाच्या पंतप्रधानांनी आंदोलक शेतकऱ्यांची चौकशी केली का ? संयुक्त शेतकरी मोर्चात मोदींना पवारांचा खडा सवाल

मुंबईः विशेष प्रतिनिधी देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीच्या सीमेवर थंडी, वाऱ्याची पर्वा न करता केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात गेले ६० दिवस आंदोलन करत आहेत. परंतु देशाच्या पंतप्रधानांनी या शेतकऱ्यांची साधी चौकशी तरी केली का असा सवाल करत केंद्र सरकाला कणव नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार …

Read More »

शरद पवार म्हणाले, सोडून गेले आणि पराभूत झाले माझी सभा झाल्यावर कळलं लोकांना कोणता बदल हवा

मुंबई: प्रतिनिधी १९८० साली माझ्यासोबतचे ५६ पैकी ५० आमदार मला सोडून गेले. पण त्यातील ४८ आमदार पराभूत झाल्याची आठवण सांगत विधानसभा निवडणूकीतही काही जूने सहकारी मला सोडून गेले. लोकांना बदल हवा होता. मात्र माझी सभा झाल्यावर कळलं कोणता बदल हवा आणि लोकांनी बदल करून दाखविला असल्याचे सांगत माझ्या अनेक सहकाऱ्यांच्या …

Read More »

कोरोना : अॅक्टीव्ह रूग्ण संख्या राज्यातल्या ८ पैकी ठाणे मंडळात सर्वाधिक २ हजार ७५२ नवे बाधित, १ हजार ७४३ बरे झाले तर ४५ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील मुंबई-ठाणे, नाशिक, पुणे, कोल्हापूर, लातूर, औरंगाबाद, अकोला, नागपूर या ८ मंडळात सर्वाधिक एकूण रूग्ण मुंबईचा समावेश असलेल्या ठाणे मंडळात आहेत. त्यानंतर पुणे आणि नाशिक, नागपूर मंडळात आहेत. त्यानंतर या चार मंडळाच्या तुलनेत इतर मंडळात संख्या कमी आहे. अॅक्टीव्ह रूग्णाच्या संख्येतही ठाणे मंडळात सर्वाधिक १९ हजार रूग्ण रूग्ण …

Read More »

नीती आयोगाच्या या यादीत महाराष्ट्र ठरला देशात अव्वल कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कौशल्य विकासासाठी विविध उपक्रम, स्टार्टअप्सला चालना, वेगवेगळ्या प्रकारचे इनोव्हेशन तथा संकल्पनांचा विकास आदींमधील नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी नीती आयोगामार्फत दिल्या जाणाऱ्या ‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स’मध्ये महाराष्ट्राने यश मिळविले आहे. नीती आयोगाने २० जानेवारी २०२१ रोजी  ‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स २०२०’ हा आपला दुसऱ्या प्रकाशनाचा निकाल जाहीर केला. यामध्ये तामिळनाडू प्रथम तर महाराष्ट्र राज्य दुसऱ्या स्थानी आले …

Read More »

मोदी सरकारच्या कृषी कायद्याविरोधात हजारो शेतकरी मुंबईत होतायत पायी दाखल हजारोंच्या संख्येने पायी, वाहनाने मुंबईत दाखल होणार

भिवंडी: प्रतिनिधी केंद्र सरकारच्या तुघलकी कृषी कायदे रद्द करण्यासाठी आणि शेती मालाला किमान आधारभूत किंमत मिळावी यासाठी नवी दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यातील हजारो शेतकरी पायी आणि वाहन मार्चने मुंबईकडे रवाना होत आहेत. मुंबईत आल्यानंतर राज्यातील शेतकरी राजभवनला घेराव घालून आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती अखिल भारतीय …

Read More »