Editor

छ.शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेपासून ५० टक्के शेतकरी वंचित एकवेळ समझोता योजना म्हणजे धुळफेक असल्याचा काँग्रेस प्रवक्ते सावंत यांचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांची देशातील सर्वात मोठी कर्जमाफी हा भाजप शिवसेना सरकारचा दावा पूर्णपणे खोटा ठरला असून या कर्जमाफीतून ५० टक्के शेतकरी वंचित राहिल्याने शेतक-यांना न्याय देण्यात ही योजना पूर्णपणे फ्लॉप ठरल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. छत्रपती …

Read More »

इतका खोटारडा पंतप्रधान देशातील जनतेने पाहिला नाही नवाब मलिक यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आव्हान

मुंबई: प्रतिनिधी पवारसाहेब काय बोलले याचा अभ्यास न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चुकीचा आणि खोटा प्रचार करत आहेत ते किती खोटारडे आहेत हे आज सिद्ध झाले आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समाचार घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार …

Read More »

पंतप्रधान मोदीमध्ये मंदीची आकडेवारी जाहीर करण्याची ताकद नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची टीका

नांदेडः प्रतिनिधी देशात मोठी मंदी आल्याचे सांगितलं जातंय. ही मंदी कायम राहिली तर देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही. इतके कारखाने आलेत पण किती आले ते सोडून किती कारखाने बंद झाले याचे आकडे मोदीनी द्यावे. पण हे आकडे द्यायची त्यांची ताकद नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान …

Read More »

राम मंदीरप्रश्नी “बडबोले”पणा करणारा राज्यातील नेता कोण ? पंतप्रधान यांच्या वक्तव्याने राज्याच्या राजकिय वर्तुळात चर्चा

मुंबईः प्रतिनिधी मागील काही वर्षांपासून रखडलेल्या राम मंदीर प्रश्नी एक नेता अयोध्येत गेला होता. तेथे त्यांनी उगीचच मोठमोठ्या गोष्टी अर्थात बडबोलेपणा केल्याची आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक येथील सभेत सांगितली. त्यामुळे राज्यातील तो “बडबोले नेता” कोण अशी चर्चा राजकिय वर्तुळात सुरू झाली. लोकसभा निवडणूकीपूर्वी युतीतील शिवसेना आणि भाजपामध्ये जागा …

Read More »

आश्चर्य, पवारांसारखा ज्येष्ठ नेताही शेजारच्या देशाबद्दल चांगल बोलतात पाकिस्तानच्या स्तुस्तीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पवारांवर टीका

नाशिकः प्रतिनिधी निवडणूकांमध्ये मते मिळावीत यासाठी शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेतेही शेजारच्या देशाबद्दल चांगले बोलत आहेत. मात्र संपूर्ण महाराष्ट्र, भारत देश आणि जगाला माहित आहे की, दहशतवादाचे अड्डे आणि शस्त्रास्त्रे कुठून येतात. त्यामुळे पवारांच्या वक्तव्याबाबत आश्चर्य वाटत असल्याची उपरोधिक टीका पंतप्रधान मोदी यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील तिसऱ्या टप्प्यातील …

Read More »

उमेदवाराच्या निवडणूक खर्चाच्या मर्यादेत वाढ करा राष्ट्रवादीची मुख्य निवडणूक आयुक्तांच्या भेटी दरम्यान मागणी

मुंबई : प्रतिनिधी सध्या महागाई वाढलेली असून जीएसटीचा खर्चही आहे. त्यामुळे उमेदवारासाठी २८ लाख रूपयांची खर्च मर्यादा ही अपुरी असल्याने निवडणूक आयोगाने खर्चाची मर्यादा वाढवावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली. आगामी विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने दोन दिवसांच्या दौऱ्यावर केंद्रीय निवडणूक आयुक्त मुंबई …

Read More »

राज्यातील ४४ लाख ६१ हजार बोगस मतदार वगळा काँग्रेसची मुख्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूक मतदान यंत्राऐवजी मतपत्रिकेवर घेण्याची तसेच राज्याच्या मतदार यादीतील ४४ लाख ६१ हजार बोगस मतदारांची नावे तातडीने वगळण्याची मागणी काँग्रेस पक्षाने देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा, अशोक …

Read More »

पक्षातून विकासासाठी गेलेल्यांना आमदार, मंत्री केले होते, त्यांनी काय केले? आगामी निवडणूकीत तरूणांईला प्राधान्य देणार असल्याची शरद पवारांची घोषणा

बीड: प्रतिनिधी आपल्या पक्षातून निघून जाताना या विभागातील नेत्यांनी विकासासाठी पक्ष सोडल्याची कबुली दिली पण मग प्रश्न पडतो की, पक्षात असताना तुम्हाला १५ वर्ष आमदार मग राज्य मंत्री केलं मग त्यावेळी तुम्ही नेमकं केलं काय असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला. गेल्या काही महिन्यात राष्ट्रवादीतील अनेक मातब्बर …

Read More »

तीन महिन्यात ३३ कोटीपैकी ३१ कोटी वृक्षांची लागवड नाशिक, नांदेड, चंद्रपूर, पुणे, यवतमाळसह कोल्हापूरात १ कोटीहून अधिकची वृक्ष लागवड झाल्याची वनमंत्री मुनगंटीवार यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी जुलै ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत ३३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प राज्याच्या वन विभागाच्यावतीने जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार जुलै ते सप्टेंबर महिना अजून पूर्ण होण्याच्या आताच राज्यात ३१ कोटी २० लाख ०७ हजार ७३७ वृक्षांची लागवड झाली असून ही संख्या ३३ कोटी संकल्पाच्या ९०.६५ टक्के इतकी …

Read More »

राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी खाजगीकरणाच्या विरोधात करणार आंदोलन सर्व जिल्हाधिकारी कार्यालय, आझाद मैदानावर आंदोलन करणार

मुंबईः प्रतिनिधी राज्य सरकारच्या सर्व विभागातील २५ टक्के पदे रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने आगामी २-३ वर्षात सरकारी सेवेतील चतुर्थश्रेणीची पदेच नष्ट होणार आहेत. त्यातच शिपाई प्रवर्गासाठी खाजगी संस्थेकडून मनुष्यबळ उपलब्ध करण्यात येत असल्याने राज्य सरकारकडून सुरु करण्यात आलेल्या खाजगीकरणाच्या विरोधात राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालये आणि मुंबईत आझाद मैदानावर १९ …

Read More »