मुंबई: प्रतिनिधी राज्यातील भाजप-शिवसेना सरकारने पाच वर्षात फसवण्याचा उद्योग करुन जनतेची दिशाभूल केली असून आता जाहिरातबाजीतही त्यांनी खोटारडेपणाची सीमा ओलांडली आहे. आरोग्य विभागाच्या जाहीरातीत दिलेली माहिती सपशेल खोटी आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. सरकारची पाच वर्षातील कामगिरी अत्यंत सुमार दर्जाची झाली असून कोणताही घटक …
Read More »मला अजून लय जणांना घरी पाठवायचय ! राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे राजकिय कुरघोडीचे संकेत
सोलापूर-मुंबईः प्रतिनिधी राज्यात पुन्हा सत्तेवर येण्याचे स्वप्न दाखवित राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच काँग्रेसमधील अनेक आमदार, नेत्यांना भाजपाने गळाला लावत विरोधकांना निष्भ्रम करण्याचा प्रयत्न सुरु केला. मात्र मी काय म्हातारा झालो? अजून लय जणांना घरी पाठवायचय असे सांगत राजकिय कुरघोडीत आपणही मागे नसल्याचे सांगत आगामी विधानसभा निवडणूकीत तोडीसतोड उत्तर देणार असल्याचे स्पष्ट संकेत …
Read More »नियोजनशून्य कारभारामुळे पाच वर्षात ६० टक्केच निधी खर्च भाजप-शिवसेना सरकारचा आर्थिक नियोजनात बेशिस्तीचा कळस: विजय वडेट्टीवार
मुंबई: प्रतिनिधी भाजप शिवसेना युती सरकारची पाच वर्षातील कामगिरी सुमार झाली असून आर्थिक नियोजनही फसले आहे. सरकारचा आर्थिक ताळेबंद पाहिला तर पाच वर्षात सर्व विभागांसाठी एकूण १४ लाख १३ हजार २७६ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली होती, परंतु ८ लाख ९६ हजार ४८२ कोटी रुपये खर्च करण्यात आले. याचाच …
Read More »आम्ही विदर्भाला पैसे दिलेच पण पश्चिम महाराष्ट्रालाही पूर्ण निधी दिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला उत्तर
सांगली-पलूसः प्रतिनिधी काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता असताना पश्चिम महाराष्ट्रात डझनभर मंत्री होते. विदर्भाचा अनुशेष म्हणून तिकडे पैसे द्यावे लागतात असे सांगून ते पश्चिम महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पांना निधी देत नव्हते. आम्ही सत्तेवर आल्यावर विदर्भाला तर निधी दिलाच पण पश्चिम महाराष्ट्रातील टेंभू- ताकारी – म्हैसाळ अशा सर्व योजनांसाठी पूर्ण निधी …
Read More »पवारांच स्टेटमेंटच मुख्यमंत्र्यांना कळलं नाही मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त देशहित पवारसाहेबांना कळते - नवाब मलिक
मुंबईः प्रतिनिधी मुख्यमंत्री पवारसाहेबांच्या स्टेटमेंटवर गैरसमज निर्माण करत आहेत. त्यांना ते स्टेटमेंटच कळलं नाही. मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त देशहित पवारसाहेबांना कळते असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. पवारसाहेब म्हणाले होते की, पाकिस्तानातील राज्यकर्ते आणि सैन्यदलातील लोकं स्वतःच्या हितासाठी व राजकीय फायद्यासाठी भारताच्या विरोधात वातावरण …
Read More »घड्याळे, स्टॉप वॉचेस, फ्रीझ, फ्रीझर, वॉटर कुलरसह अनेक वस्तूंच्या किंमती कमी होणार १९३ वस्तूंवरील कर दरात घट झाल्याची अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी वस्तू आणि सेवा कर कायद्यांतर्गत तीन टप्प्यात वस्तूंचे दर कमी करण्यात आले. यामध्ये २२८ पैकी १९३ वस्तुंवरील कर २८ टक्क्यांहून १८ टक्के इतके कमी करण्यात आले. १८ टक्क्यांच्या व १२ टक्क्यांच्या कर दराच्या स्लॅबमधील काही वस्तूंचे कर दर आणखी कमी करण्यात आले तर काही वस्तूंवर करमाफी देण्यात …
Read More »हिंदूत्ववाद्यांसाठी दलाली करणाऱ्या केंद्रीय मंत्री आणि डांगळेंच्या बैठकीवर बहिष्कार घाला आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांकडून साहित्यिक, विचारवंत, विद्यार्थ्यांना आवाहन
मुंबईः प्रतिनिधी राज्यात विधानसभा निवडणूकीचे पडघड वाजायला सुरुवात झालेली असतानाच निवडणूकीत आपल्याच पक्षाचा वरचष्मा रहावा यासाठी प्रत्येक राजकिय पक्षाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि दलित साहित्यिक अर्जून डांगळे यांनी आंबेडकरी विचारधारेवर आधारीत संस्थेची उभारणी करण्याकरीता एका बैठकीचे आयोजन केले. मात्र …
Read More »शिवाजी महाराजांशी संबधित गड-किल्ल्यासाठी उच्चाधिकार समिती राज्य मंत्रिमंडळाच्या टिपणीत सुधारणा
मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या पर्यटनाबरोबरच महसूली उत्पन्नवाढीसाठी राज्यातील गड-किल्ले लग्न समारंभ, हॉटेल्स, पार्टीकरीता भाडेतत्वावर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र या निर्णयावर राज्यातील सर्वचस्तरातून टीकेची झोड उठल्याने अखेर राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबधित गड-किल्ल्यांना विकसित करण्यासाठी उच्चाधिकारीची स्थापना करत राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या टिपणीत सुधारणा करण्यात आल्याची माहिती हाती …
Read More »महाजनादेश यात्रा झाली शासकिय यात्रा ? मुख्यमंत्री जनसंपर्क कार्यालयातून भाजपाच्या यात्रेची माहिती
मुंबईः प्रतिनिधी राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दैनंदिन शासकिय कार्यक्रम प्रसारमाध्यमांना कळावेत यासाठी राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या मुख्यमंत्री जनसंपर्क कार्यालयातून त्याची माहिती देण्यात येते. मात्र शासकिय मुख्यमंत्र्यांचे शासकिय कार्यक्रम- बैठकांची माहिती देण्याऐवजी भाजपच्या राजकिय असलेल्या महाजनादेश यात्रेची माहिती मुख्यमंत्री जनसंपर्क कार्यालयाकडून प्रसारमाध्यमांना कळविण्यात येत असल्याने महाजनादेश यात्रा …
Read More »पं.दिनदयाल संस्थेला तो भूखंड अद्याप दिलेला नाही अखेर मराठी ई-बातम्याच्या वृत्तावर राज्य सरकारचा खुलासा
मुंबईः प्रतिनिधी चर्नी रोड स्टेशन लगत असलेली जवाहर बालभवन लगतचा भूखंड राज्य सरकारकडून पंडित दिनदयाल सेवाभावी संस्थेला देण्याचा घेतलेला निर्णय मराठी ई-बातम्या.कॉम या संकेतस्थळावर प्रसिध्द होताच तो भूखंड सदर संस्थेला द्यायचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नसल्याचा खुलासा उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केला. मराठी ई-बातम्या संकेतस्थळावर वृत्त प्रकाशित झाल्यानंतर …
Read More »
Marathi e-Batmya