Editor

भाजप सरकारला पाकिस्तानचा कांदा कसा चालतो? राज्य सरकारला पाकिस्तानी शेतक-यांबद्दल प्रेम उफाळून आल्याचा आ. बाळासाहेब थोरातांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी महाराष्ट्र सरकारच्या अधिपत्याखालील एमएमटीसीने (मेटल्स अँड मिनरल्स ट्रेडिंग कॉर्पोरेशन) ने पाकिस्तानी कांद्याच्या आयातीसाठी निविदा काढली आहे. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतक-यांना वा-यावर सोडणा-या राज्य सरकारला पाकिस्तानी शेतक-यांबद्दल प्रेम का उफाळून आले आहे? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. महाराष्ट्र सरकारच्या अधिपत्याखालील …

Read More »

पवारांच्या भेटीनंतर उदयनराजे भाजपात जाहीर प्रवेश करणार मोदींच्या उपस्थितीत होणार प्रवेश सोहळा

पुणे-मुंबईः प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीकोनातून सत्तेत राहता यावे या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेल्या मनधरणीला बगल देत सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अधिकृतपणे आपण भाजपा पक्षात प्रवेश करत असल्याचं जाहीर केले. विशेष म्हणजे शरद पवार यांच्या भेटीनंतर …

Read More »

दोन वर्षांत कोणीही बेघर राहणार नाही महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार

अहमदनगरः प्रतिनिधी महाराष्ट्रात बेघर असलेल्या सर्वांना घरे देण्याचे काम वेगाने चालू असून २०२१ पर्यंत राज्यातील कोणीही बेघर असणार नाही, प्रत्येक गरीबाला रहायला घर मिळेल, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी व्यक्त केला. महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याच्या पहिल्या दिवशी अहमदनगर जिल्ह्यात अकोले येथे जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ …

Read More »

मोदी – फडणवीस आम्ही केलेल्या कामांची उद्घाटने करत डंका पिटतायत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी देशात मोदी आणि राज्यात फडणवीस आम्ही केलेल्या कामांची उद्घाटने करत विकासकामांचा डंका पिटत असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. निवडणुका जवळ आल्यावर केंद्र व राज्य सरकार मोठमोठया जाहिराती आणि विकासकामांची उद्घाटने करत विकास आम्हीच करत आहे असे सांगत असल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वेमंत्री पियुष …

Read More »

पारदर्शक मुख्यमंत्री, महसूल मंत्र्यांना लागली गोडी भूखंडाच्या श्रीखंडाची प.दिनदयाल सेवाभावी संस्थेला मुंबईतील १२०० चौ.मीटरची जागा

मुंबईः खास प्रतिनिधी राज्यातील जनतेच्या अर्थात राज्य सरकारच्या मालकीचा भूखंड पत्नीसाठी तिरूपती देवस्थानला देण्याचा प्रताप नुकताच उघडकीस आला. आता त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्थापन केलेल्या पंडीत दिनदयाल उपाध्याय सेवाभावी संस्थेस भूखंडाचे श्रीखंड देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यासाठी महसूल आणि शिक्षण विभागाने फारच सोपस्कार …

Read More »

बारामतीकरांना रोखण्यासाठी भाजपात हर्षवर्धन पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत प्रवेश

मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात शरद पवार यांना रोखण्यासाठी भाजपाकडून सातत्याने कुरघोडीचे राजकारण करण्यात येत आहे. त्याच दृष्टीकोनातून राष्ट्रवादीला खिंडार पाडत अनेक नेत्यांना भाजपात आले. आता थेट बारामती लोकसभा मतदारसंघातील बालेकिल्ल्यात हात घालत पवार कुटुंबियांचे कट्टर विरोधक आणि काँग्रेस नेते असलेल्या हर्षवर्धन पाटील यांना भाजपात आणत मुख्यमंत्री देवेद्र …

Read More »

भाजपा-सेनेतील नाराज राष्ट्रवादीच्या संपर्कात, पण मुख्यमंत्र्यांमुळे नावे जाहीर करणार नाही दिक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेबांना वंदन करून राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेची आज सुरुवात

नागपुर: प्रतिनिधी राष्ट्रवादी पक्षातील अनेक लोक शिवसेना आणि भाजपात जात आहेत. परंतु सेना – भाजपात गेली तीन – चार वर्षे निवडणूक लढवण्याकरीता काम करणारे लोक दुखावले आहेत. अशी दुखावलेली मंडळी माझ्या संपर्कात असून त्यांची नावे जाहीर करणार नाही. कारण मुख्यमंत्री साम-दाम-दंड भेदाचे सूत्र वापरण्यात माहीर असल्याने त्यांची योग्य वेळी नावे …

Read More »

पाच वर्षातल्या ६० लाख रोजगारांची यादी जाहीर करा ६० लाख रोजगार निर्मितीचा दावा खोटा व फसवा असल्याचा काँग्रेसचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी राज्यात पाच वर्षात ६० लाख रोजगार निर्मिती केल्याचा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा दावा धादांत खोटा, हास्यास्पद तसेच बेरोजगार तरुणांची फसवणूक करणारा आहे. ६० लाख रोजगार कोणत्या-कोणत्या जिल्ह्यात दिले आणि कोणत्या कंपनीत याची नावासह यादी जाहीर करा, असे थेट आव्हान विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे. भाजप-शिवसेना …

Read More »

प्रसारमाध्यमांच्या चर्चेत राहून प्रकाश आंबेडकर जनतेची दिशाभूल करतायत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी लोकसभेत वेगळे लढले असताना आम्ही अमुक जागा देतो सांगून टिव्ही, वर्तमानपत्रात चर्चेत राहून प्रकाश आंबेडकर जनतेची दिशाभूल करीत असल्याचा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाणार नाही असे जाहीर केले. …

Read More »

काँग्रेसची वाट बघणार नाही मात्र एमआय़एमशी चर्चा सुरुच ठेवणार वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणूकीसाठी काँग्रेस पक्षासोबत आघाडी करण्यासंदर्भात केंद्रीय नेत्यांशी वंचित आघाडीचे पदाधिकारी संपर्कात होते. मात्र त्यांच्याकडूनही लोकसभेच्या कालवधीप्रमाणे फक्त चर्चेत गुंतवणूक ठेवण्याचा प्रकार सुरु असल्याने त्यांची फारकाळ वाट बघणार नसल्याचे जाहीर करत लवकरच उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. …

Read More »