Editor

१ लाख रूपयांपर्यत उत्पन्न असणाऱ्यांना ८ रू. आणि १२ रू.ने तांदूळ -गहू २४ तारखेपासून वाटप होणार रेशनिंगच्या दुकानातून

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केलेला असल्याने या कालावधीत सर्वच व्यावसायिक संस्था, रोजगाराच्या संधी बंद आहेत. त्यामुळे कमी उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच ज्यांचे उत्पन्न ५९ हजार ते १ लाख रूपयांपर्यत असणाऱ्या केशरी कार्डधारकांना ८ रूपये प्रति …

Read More »

बेकायदेशीर वागणाऱ्यांकडून २ कोटी ३० लाखांची तिजोरीत भर कोविड संदर्भात ६० हजार गुन्हे दाखल -१३ हजार व्यक्तींना अटक तर ४१ हजार वाहने जप्त

मुंबई: प्रतिनिधी राज्यात सर्वत्र सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात २२ मार्च ते २०एप्रिल या कालावधीत राज्यात कलम १८८ नुसार ६० हजार ५ गुन्हे दाखल झाले आहेत. तर १३,३८१ व्यक्तींना अटक करण्यात आली असून ४१,७६८ वाहने जप्त करण्यात आली असून विविध गुन्ह्याखाली बेकायदेशीर वागणाऱ्यांकडून २ कोटी ३० लाख रूपयांचा दंड आकारण्यात  आल्याची …

Read More »

अमित शाह, फडणवीस बोलले…देशमुख यांची हकालपट्टी करा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई: प्रतिनिधी पालघर जिल्ह्यात पोलिसांच्या साक्षीने दोन साधूंची जमावाकडून हत्या झाल्याची मॉब लिंचिंगची घटना अत्यंत धक्कादायक आणि निषेधार्ह आहे. राज्यात वारंवार कायदा सुव्यवस्थेची समस्या निर्माण होत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी व या घटनांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी …

Read More »

स्व. सरदार पटेलांनी प्रशासनाला दिशा दाखविलीय शरद पवार यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी देशाला स्वातंत्र मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री स्व.सरदार वल्लभभाई पटेल यांनी पहिल्या सिव्हील सर्व्हीस प्रशासनाची बाहेर पडलेल्या बॅचला मार्गदर्शन केले. तो दिवस म्हणजे २१ एप्रिल हा दिवस. त्यांनी प्रशासकिय यंत्रणेला दिशा दाखविली, आत्मविश्वास व्यक्त केला. तो दिवस आजही पाळला जात असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितले. …

Read More »

मृत्युदर चिंताजनक…तरी आत्मविश्वास वाढवूया मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण - डोंबिवलीत कठोर अंमलबजावणीची गरज असल्याचे शरद पवारांचे मत

मुंबई: प्रतिनिधी आज आपल्यावर संकट आले आहे. या संकटासंबंधी निगेटिव्ह विचार सोडून देऊया. त्याचा सामना करणार आहोत त्यात यशस्वी होणार आहोत ही स्थिती निर्माण करूया. लोकांचा आत्मविश्वास वाढवूया… आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी जे जे प्रयत्न करणार आहोत ते कसे समाजासमोर येईल याची काळजी घेवूया असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी …

Read More »

राज्यात नवे ४६६ रूग्णांचे निदान तर ५७२ जणांना घरी पाठविले कोरोनाग्रस्तांची संख्या ४६६६ वर पोहोचली

मुंबई : प्रतिनिधी राज्यात कालच्या तुलनेत आज जवळपास १०० रूग्णांच्या संख्येत घट झाली असून आज ४६६ नव्या रूग्णांचे निदान झाले आहे. रविवारी हीच संख्या ५५२ वर पोहोचली होती. मात्र नव्याने निदान झालेल्या रूग्णांच्या संख्येत घरी पाठविलेल्या रूग्णांची संख्या ५७२ आहे. त्यामुळे एकाबाजूला रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत असली तरी रोज …

Read More »

मंत्री गुलाबराव पाटीलांच्या खाजगी सचिवाचा असाही पुढाकार मुख्यमंत्री सहायता निधीला एक लाख रुपयांची देणगी

मुंबई: प्रतिनिधी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्यालयातील खाजगी सचिव अशोक सखाराम पाटील यांनी आज मुख्यमंत्री सहायता निधी- कोविड-19, साठी एक लाख रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे मंत्रालयात सुपूर्द केला. कोविड विषाणू प्रार्दुभावाच्या विरोधात शासनामार्फत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी अधिकाधिक निधी देणगी म्हणून देण्यात यावा, …

Read More »

उगाच बोंबा का मारताय? राजभवनच्या मदतीला आशिष शेलार

मुंबई: प्रतिनिधी घटनात्मक महत्त्वाचे पद असणाऱ्या महामहिम राज्यपालांच्या राजभवनाकडे बघून का बोंबा मारताय? असा खडा सवाल भाजप नेते माजी शिक्षण मंत्री आमदार अँड आशिष शेलार यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना करत राजभवनाच्या मदतीला धावले. राज्यपालांवर खा. संजय राऊत यांनी टीका केली होती त्याला आमदार अँड आशिष शेलार यांची जोरदार …

Read More »

खा. सुप्रिया सुळे म्हणतायत, “लाईफ इज ब्युटीफुल” पण “बदलावं लागणार” फेसबुकवरुन जनतेशी साधला संवाद

मुंबई: प्रतिनिधी आता १४-१५ दिवस शिल्लक राहिले आहेत. सुरक्षित राहुया कारण ‘लाईफ इज ब्युटीफुल’ छोट्या – छोट्या गोष्टी आता महत्वाच्या वाटू लागल्या आहेत. कदाचित म्हणूनच नियतीच्या मनात काहीतरी असेल म्हणून तिने आपल्याला थोडंसं ‘चेक्स इज बॅलन्सस’ मध्ये जगायला शिकवलं. प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकायला मिळते. मी अनुभवातून शिकते. मी माझ्या आयुष्यात …

Read More »

१५०० पोलिसांच्या पदोन्नतीला मुहूर्त सापडेना १० फेब्रुवारीला आदेश काढूनही पुर्तता नाही

मुंबई: प्रतिनिधी नि:शस्त्र पोलीस उप निरीक्षक पदी पदोन्नती देण्यासाठी विभागीय अर्हता परीक्षा- २०१३ मधील पात्र असलेल्या १५०० उमेदवारांची उप निरीक्षक पदी पदोन्नती रखडली आहे. या यादीत सर्वाधिक ५६३ पदे ही मुंबई पोलीस आयुक्तांलयाच्या अंतर्गत येत असून पुण्यात ९४ पदोन्नतीची प्रकरणे आहेत. ही पदे तत्काळ भरण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली …

Read More »