मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षात विकासाच्या नावाखाली पक्षांतर करण्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र एका राजघराण्यातील जावयाला यंदाच्या निवडणूकीत तिकिट देता यावे यासाठी भाजपाच्या कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे ४ टर्म अर्थात २० वर्षे प्रतिनिधित्व करणाऱ्या निष्ठावंत आमदाराला घरचा रस्ता दाखविणार असल्याची माहिती भाजपाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली. मुंबईतून संभावित …
Read More »अजित पवार यांचा आमदारकीचा राजीनामा विधानसभाध्यक्ष बागडे यांच्याकडून मंजूर
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील आगामी विधानसभेच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झालेला असतानाच विद्यमान विधानसभा सदस्यत्वाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी राजीनामा आज दिला. विशेष म्हणजे त्यांनी हा राजीनामा विधानसभा अध्यक्षांच्या दालनात जावून दिल्याने त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आल्याची माहिती विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिली. राज्य शिखर बँकेच्या कथित आर्थिक घोटाळ्यात राष्ट्रवादी …
Read More »घरबसल्या एका क्लिकवर मिळणार मतदान केंद्राची माहिती मतदात्यांसाठी निवडणूक आयोगाची खास वेबसाईट
मुंबई : प्रतिनिधी मतदारांना एका क्लिकवर मतदान केंद्र व मतदार यादीतील त्यांची माहिती मिळविण्याची सुविधा निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या माहितीमध्ये मतदान केंद्र, मतदार क्रमांक यांचा समावेश आहे. अनेक मतदारांना आपले मतदार ओळख क्रमांक, मतदान केंद्राचे नाव, मतदार यादीतील क्रमांकाची माहिती नसते. मतदानादिवशी मतदारयादीतील …
Read More »अधिसूचना जारी, उमेदवारी अर्ज आजपासून दाखल होणार निवडणूक आयोगाकडून निवडणूक प्रक्रियेस सुरूवात
मुंबईः प्रतिनिधी महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या कार्यक्रमास आता प्रत्यक्षात सुरुवात झाली असून निवडणूकीसाठी उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज दाखल आता करता येणार आहे. राजकिय पक्षांना आणि अपक्ष उमेदवारांना त्यांचे अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात अर्थात निवडणूक अधिकाऱ्यांकडे आजपासून दाखल करता येणार आहे. राज्यातील सर्वच ग्रामीण आणि शहरी भागातील उमेदवारांसाठी निवडणूक आयोगाकडून आज अधिसूचना प्रसिध्द …
Read More »पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार, ईडी कार्यालयात जाणार नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबईतील कार्यालयात स्वत:च उपस्थित राहणार असल्याचे शरद पवार यांनी जाहीर केले होते. त्यानंतर खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांकंडून कुलाबा, कफ परेड, मरीन ड्राइव्ह, आझाद मैदान, डोंगरी, जे. जे. मार्ग, एमआरए मार्ग या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जमावबंदीचे आदेश दिले होते. याव्यतिरिक्त अनेक …
Read More »“ईडी” ने ( पवार ) “पीडा” सध्यातरी टाळली सध्या येण्याची गरज नसल्याचे ईडीने कळविल्याची राष्ट्रवादीची माहिती
मुंबईः प्रतिनिधी राज्य शिखर बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या विरोधात ईडी (सक्तवसुली संचालनालय) कार्यालयाने गुन्हा दाखल केला. या गुन्हा नोंदण्याची माहिती मिळताच शरद पवार हे स्वतः आज २७ सप्टेंबरला दुपारी त्यांच्या कार्यालयात जाणार होते. परंतु पवार पोहोचण्यापूर्वीच ईडी कार्यालयाकडून त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याची गरज नसल्याचा ईमेल …
Read More »मोदी – शहा, फडणवीस यांच्या नावाने शिमगा राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी
मुंबईः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे ईडीच्या कार्यालयात हजर होणार असल्याने पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला असून जागोजागी ईडीच्या कार्यालयाकडे येणाऱ्या लोकांची कसून चौकशी आणि तपासणी केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयासमोर कार्यकर्ते व पदाधिकारी मोठया संख्येने जमा झाले असून मोदी- शहा आणि फडणवीस यांच्या नावाने शिमगा …
Read More »केंद्रावर आरोप करण्याऐवजी पवारांनी सर्वोच्च न्यायालयात जावे भाजप प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांचे आव्हान
मुंबईः प्रतिनिधी साखर कारखान्यांच्या विक्रीत झालेल्या गैरप्रकारांना जबाबदार असणाऱ्या राज्य सहकारी बँकेच्या तत्कालीन संचालकांविरुद्ध व अन्य संबंधित मंडळींविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आपल्या निर्दोषत्वाची खात्री असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात जावे असे आव्हान भाजप चे प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी …
Read More »शरद पवार परत येतायत….हुकूमशहांना जाब विचारण्यासाठी भाजपा-शिवसेनेला इशारा
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील ऐन लोकसभा निवडणूकांच्या तोंडावर राज्य शिखर बँकेच्या आर्थिक घोटाळ्यात नाव आल्याने भाजपा-शिवसेनेचे सरकार उखडून फेकण्यासाठी शरद पवार यांनी राज्यातील जनतेला परत येत असल्याचे सांगण्यासाठी मी परत येतोय असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पोस्टरमधून सांगायला सुरुवात केली आहे. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यावर ऐन विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर गुन्हा दाखल केला. …
Read More »बहुजन आघाडीतले “वंचित” बनू लागले प्रस्थापित लक्ष्मण माने, एमआयएमनंतर गोपीचंद पडळकर बाहेर
मुंबईः प्रतिनिधी प्रस्थापित काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना या राजकिय पक्षांना समर्थ पर्याय ठरण्यासाठी आणि उपेक्षित-वंचित समाजाचा स्वतंत्र आवाज निर्माण करण्यासाठी अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. मात्र या वंचित आघाडीतून भटक्या-विमुक्त जमातीचे लक्ष्मण माने, मुस्लिम धर्मियांचा पक्ष म्हणून ओळखला जाणारा एमआयएम हे आधीच पडले असून धनगर …
Read More »
Marathi e-Batmya