एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रमुक पक्षाने ८ जून रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या प्रस्तावित इंडिया ब्लॉक बैठकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे, कारण विधानसभा निवडणुकीनंतर तामिळनाडूमध्ये झालेल्या नाट्यमय राजकीय फेरबदलामुळे काँग्रेससोबतच्या संबंधांमध्ये निर्माण झालेला दुरावा आता अधिकच वाढला आहे. द्रमुकचा दीर्घकाळचा मित्रपक्ष असूनही, तामिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी अभिनेता विजयच्या टीव्हीकेला …
Read More »कॉकरोच जनता पार्टीचा निर्धार, काहीही झाले तरी आंदोलन थांबणार नाही सोनम वांगचूक यांचा पाठिंबा मिळाला आहे, परवानगी नाकारली तरी आंदोलन करणार
ऑनलाइन व्यंग्यात्मक मोहीम म्हणून सुरू झालेली कॉकरोच जनता पार्टी (CJP), आता भारताच्या शिक्षण व्यवस्थेशी संबंधित अलीकडील वादांच्या निषेधार्थ शनिवारी नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे आपल्या पहिल्या ऑफलाइन आणि प्रत्यक्ष आंदोलनासाठी सज्ज झाली आहे. CJP च्या अधिकृत प्रवक्त्यांनी सांगितले की, ते आंदोलनाच्या दिवशीच (६ जून) जंतर मंतरवर आंदोलनासाठी परवानगी मागतील आणि …
Read More »१७ पैकी ६ ठिकाणी बंडखोरांचा थंडोबा करण्यात महायुतीला यश १२ जागांवर महायुती आणि महाविकास आघाडीत थेट लढत
राज्यातील १७ स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील विधान परिषदेच्या निवडणूकीत महायुतीच्या उमेदवारांचे बंड शमवण्यात कुठे काही नेत्यांना यश आलं, तर कुठे ऐनवेळी उमेदवारांनी माघार घेतल्याने राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलून गेली आहेत. या सर्व घडामोडींनंतर १७ पैकी ५ जागांवर निकाल आधीच स्पष्ट झाला असून उर्वरित १२ जागांवर आता महायुती आणि महाविकास …
Read More »दिलीप वळसे पाटील यांनी घेतली शरद पवार यांची भेट साखर उद्योग, कांदा प्रश्न आणि रयत शिक्षण संस्था यासंदर्भातच चर्चा झाल्याची दिलीप वळसे पाटील यांची माहिती
साखर उद्योगासमोर असलेले प्रश्न, कांदा उत्पादक शेतकरी आणि रयत शिक्षण संस्था या तीनच विषयावर शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांना दिली. आज सकाळी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा सवाल, कर्जमुक्तीच्या अटी दिलासासाठी की, कर्जाचा विळखा घटट् करण्यासाठी कर्मजाफी योजना शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक
महायुती सरकारची कर्जमाफी योजना म्हणजे शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक आहे. यात सरकारने टाकलेले अटी शर्तींचे जाळे पाहिले तर ही योजना शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आहे की त्यांच्याभोवती कर्जाचा विळखा अधिक घट्ट करण्यासाठी आहे हा प्रश्न पडतो. विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ दरम्यान घेतलेले पीक …
Read More »कोकण भवनात ज्येष्ठ नागरिक महामंडळाचे कार्यालय सुरू विविध योजनांसह ५० कोटींचा निधी मंजूर
ज्येष्ठ नागरिकांना त्यांचा वृद्धापकाळ सुखाचा आणि सन्मानाचा घालवता यावा, यासाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत स्थापन करण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक महामंडळाचे कार्यालय कोकण भवन येथे कार्यान्वित करण्यात आले आहे. अशी माहिती ज्येष्ठ नागरिक महामंडळाचे सहव्यवस्थापक यांनी दिली. या महामंडळाच्या माध्यमातून ज्येष्ठांचे सामाजिक जीवन सुसह्य करणे, त्यांचे शारीरिक …
Read More »दिव्यांग संस्थांना मोठा दिलासा; ५८ संस्थांना त्रुटी पूर्ततेची संधी ७४ उपक्रमांना १०० टक्के वेतन अनुदानासाठी अंतिम मुदत
राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कार्यरत विशेष शाळा आणि पुनर्वसन संस्थांना शासनाने मोठा दिलासा दिला असून विविध अनुदान योजनांअंतर्गत अपात्र ठरलेल्या संस्थांना त्रुटी पूर्ततेची अंतिम संधी देण्यात आली आहे. दिव्यांग सक्षमीकरण विभागाने यासंदर्भात स्वतंत्र आदेश जारी करून संबंधित संस्थांकडून आवश्यक कागदपत्रे निश्चित मुदतीत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. शासन निर्णय १६ जुलै …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, संपन्न महाराष्ट्रासाठी पायाभूत सुविधांचे निर्मिती गतीने पूर्ण करा पायाभूत सुविधा मुख्यमंत्री वॉर रूम बैठकीत विविध प्रकल्पांचा आढावा
महाराष्ट्राच्या संपन्नतेसाठी पायाभूत सुविधांच्या निर्मिती प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण होणे गरजेचे आहे. संबंधित यंत्रणांनी प्रकल्प पूर्णत्वातील अडचणी दूर कराव्यात. कंत्राटदाराला देण्यात आलेल्या कालावधीत प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे याकडे संबंधित यंत्रणांनी लक्ष द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विलंबाने काम पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांना पुढील कुठलेही नवीन काम संबंधित यंत्रणेने देऊ …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाकडून विरोधी उमेदवारांना कोट्यवधींच्या ऑफर्स सत्तेच्या हव्यासापोटी भाजपाने लोकशाही मुल्ये पायदळी तुडवली; भाजपाला इलेक्शन नाही तर नॉमिनेशन सिस्टिम आणायचीय
भारतीय जनता पक्षाची सर्वत्र सत्ता असतानाही आणखी सत्ता हवी या सत्तेच्या हव्यासापोटी ते लोकशाही मुल्ये पायदळी तुडवत आहेत. विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना कोट्यवधी रुपयांच्या ऑफर्स दिल्या जात आहेत. उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत यासाठी भाजपाने नैतिकता गुंडाळून सर्व हातखंडे वापरले आहेत. भाजपाला लोकशाही नको आहे, ‘इलेक्शन सिस्टिम’ …
Read More »राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीतील नाटकाची तिकिटे ‘तिकीटालय’ ॲपवर उपलब्ध होणार मंत्री ॲड. आशिष शेलार यांची माहिती
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ३६ व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेची अंतिम फेरीस ८ जून ते १८ जून २०२६ या कालावधीत येथील छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरात पार पडणार आहे. या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच यावर्षी ऑनलाईन पद्धतीने ‘तिकीटालय’ ॲपवरून या स्पर्धेतील नाटकाची तिकिटे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे मंत्री ॲड.आशिष शेलार सांगितले. राज्यातील दर्जेदार व्यावसायिक नाट्यप्रयोगांचे …
Read More »
Marathi e-Batmya