मध्य प्रदेशात व्यापम नोकर भरती घोटाळा झाला होता, परंतु आपल्याकडील एमपीएससी (MPSC) नोकर भरतीचा घोटाळा व्यापमपेक्षा मोठा आहे. एमपीएससीची सर्व व्यवस्थाच भ्रष्ट झाली असून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरु असलेला खेळ थांबला पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घालून तातडीने ऑनलाईन परीक्षा व Normalization रद्द करावे, अन्यथा राज्यभर आंदोलन …
Read More »देशातील सर्वात मोठे ॲग्रीकल्चरल कन्व्हेंशन सेंटर नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पाहणी
अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे देशातील सर्वात मोठे इंटरनॅशनल ॲग्रीकल्चरल कन्व्हेंशन अँड एक्झिबिशन सेंटर नागपुरातील दाभा परिसरात उभारले जात असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या कामाची पाहणी करून कामाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. कृषी प्रदर्शनाशिवाय अन्य प्रदर्शने, परिषदा याकरिता कन्व्हेंशन व्हेन्यू म्हणून हे सेंटर जगभर ख्यात होईल आणि नागपूर शहराला …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, अॅक्युपंक्चर उपचार शिक्षणाच्या विस्तारासाठी राज्य शासन प्रयत्नशील मी स्वतः पाठदुखीने त्रस्त असताना या उपचार पद्धतीचा लाभ
अॅक्युपंक्चर उपचार पद्धतीतून असंख्य रूग्णांना आपल्या व्याधीपासून मुक्त होण्यास मदत झाली आहे. तेवीस-चोवीस वर्षांपूर्वी मी स्वतः पाठदुखीने त्रस्त असताना या उपचार पद्धतीने मला तंदुरुस्त होता आले. या ज्ञानशाखेच्या विस्तारासाठी व याचे शैक्षणिक मार्ग वृद्धींगत व्हावेत, या दृष्टीने राज्य शासन प्रयत्नशील असून शासकीय पातळीवर कोठेही कमतरता पडणार नाही, अशी निःसंदिग्ध ग्वाही …
Read More »राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते ‘१०० सर्वाधिक प्रभावशाली महिलांचा सन्मान’ महिला स्वयंसहायता गटांमुळे देशात क्रांती
महिला स्वयंसहायता गटांमुळे देशातील महिलांच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय सक्षमीकरणाला गती लाभली असून ग्रामीण – आदिवासी महिलांच्या जीवनात क्रांतिकारक बदल झाले आहेत. गावोगावींच्या महिलांमध्ये नेतृत्वगुण विकसित होत आहेत. हे कार्य अधिक जोमाने होण्यासाठी समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज येथे केले. ‘फॉर्च्युन इंडिया’ …
Read More »कन्हैया कुमार यांची मागणी, देणगी चोरीची न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करा, ट्रस्ट बरखास्त करा प्रभूरामाचे दान चोरणे महापाप, कोट्यवधी रामभक्तांच्या श्रद्धेशी चाललेला खेळ काँग्रेस खपवून घेणार नाही
भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हिंदू धर्माशी काहीही देणेघेणे नाही, फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी ते धर्माचा वापर करत असून त्यांचा एकच राम आहे आणि तो म्हणजे नथुराम, प्रभुरामाशी त्यांचे काहीही देणेघेणे नाही. रामभक्तांनी प्रभू रामाला भक्तीभावाने पैसे, सोने, चांदी दान केले, त्यावर भाजपा आरएसएसच्या लोकांनी दरोडा टाकला आहे. प्रभूरामाच्या नावावर कोट्यवधींची …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, कर्जमुक्ती योजनेतील ५० हजार रुपयांची अट काढली, २ लाखांपर्यंत कर्ज माफ 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने' तून ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटींचा लाभ
राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ देणारी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ ही ऐतिहासिक योजना असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ५० हजार रुपयांचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेमध्ये ५० …
Read More »विजय वडेट्टीवार यांची मागणी, राम मंदिर देवस्थान विश्वस्त व्यवस्था विधेयक, संयुक्त समितीकडे पाठवा विश्वस्त मंडळावर लोकप्रतिनिधी,राजकीय व्यक्ती नसाव्या, विश्वस्त मंडळावरील सदस्यांना भत्ते देऊ नये
विधानसभेत मांडण्यात आलेल्या ‘श्री राम मंदिर देवस्थान विश्वस्त व्यवस्था, रामटेक विधेयक’ यावर चर्चा करताना काँग्रेस विधिमंडळ विजय वडेट्टीवार यांनी विधेयकातील अनेक तरतुदींवर गंभीर आक्षेप नोंदवत हे विधेयक संयुक्त समितीकडे पाठवण्याची मागणी केली. विजय वडेट्टीवार म्हणाले की, प्रभू रामचंद्रांबद्दल जनतेच्या मनात प्रचंड श्रद्धा आणि भक्ती आहे. त्यामुळे रामटेकसारख्या पवित्र आणि ऐतिहासिक …
Read More »जयंत पाटील यांचा इशारा, रामटेक मंदिर ट्रस्टमध्ये इतका भ्रष्टाचार होईल की अयोध्येचे मंदिरही मागे पडेल विश्वस्तांमध्ये भोसले कुटुंबातील एकच व्यक्ती का
‘श्री राम मंदिर देवस्थान विश्वस्त व्यवस्था, रामटेक विधेयक’ आज विधानसभेत मांडण्यात आले. राजकारणी लोकांना ट्रस्टवर घेऊ नका, इतका भ्रष्टाचार होईल की अयोध्येचे मंदिर मागे पडेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांनी दिला. या विधेयकावर मत मांडताना जयंत पाटील असे म्हणाले की, भोसले कुटुंबाचा …
Read More »एकनाथ शिंदे यांची ग्वाही, सुरक्षित, सक्षम आणि विकसित महाराष्ट्रासाठी शासन कटिबद्ध आपत्ती व्यवस्थापनात तात्काळ प्रतिसाद आणि नागरिकांच्या सुरक्षिततेवर भर
सुरक्षित, सक्षम आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, आपत्ती व्यवस्थापन, पायाभूत सुविधा, कायदा-सुव्यवस्था, महिला सुरक्षा, जलसंधारण, पुनर्विकास आणि नागरिकाभिमुख विकासकामांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत केले. अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना ते बोलत होते. एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, मुंबईतील मेगा काँक्रीट …
Read More »नरहरी झिरवाळ यांचे आश्वासन, अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी अतिरिक्त निधीसाठी पाठपुरावा सुरू वाढत्या महागाईचा विचार करून शिष्यवृत्ती वाढविण्याचा विचार
अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती वितरित करण्यासाठी आवश्यक अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न असून, वाढत्या महागाईचा विचार करून शिष्यवृत्ती वाढविण्याबाबतही सकारात्मक विचार केला जाईल, अशी माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत दिली. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य अबु आझमी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री नरहरी झिरवाळ बोलत होते.या …
Read More »
Marathi e-Batmya