शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) ही सेवामूल्यमापनासाठी नसून मूलभूत शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेची पडताळणी करण्यासाठी आहे. टीईटी संदर्भात सदस्यांनी मांडलेल्या सर्व सूचनांची शासनाने नोंद घेतली असून त्यावर सकारात्मक विचार केला जाईल. तसेच राज्यातील सर्व शिक्षकांना गुगल एज्युकेशनच्या सहकार्याने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) विषयाचे मोफत प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज …
Read More »शंभूराज देसाई यांची माहिती, मग्रारोहयो अंतर्गत मजूरांना १०० दिवसांचा रोजगार मिळालाच पाहिजे मग्रारोहयोचा केंद्राच्या हिश्याचा निधी अद्याप महाराष्ट्राला नाही
राज्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत व्यापक पातळीवर मजूरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासोबतच विविध विकास कामे गतीने होण्यासाठी केंद्र शासनाच्या सूचनेनुसार मुंबई येथे आमदारांची आणि जिल्हा, तालुकास्तरावरील लोकप्रतिनिधी; तसेच अधिकाऱ्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. मग्रारोहयोच्या मजूरांना १०० दिवसांचा रोजगार मिळालाच पाहिजे, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत सांगितले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड व सोयगाव …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, बीडमधील भूसंपादन मावेजा वाटपाच्या गैरव्यवहाराचे ७३ कोटी वसूल करणार भूसंपादनाच्या नावाखाली अवैधरित्या रकमेचे वितरण
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या धुळे-सोलापूर महामार्गामधील बीड जिल्ह्यातील भू संपादनाखाली अवैधरित्या वितरीत करण्यात आलेली ७३ कोटी रुपयांची रक्कम वसूल करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत सांगितले. बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग भूसंपादनाच्या ‘मावेजा’ वाटपात झालेल्या गैरव्यवहारासंदर्भात सदस्य काशिनाथ दाते यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे …
Read More »जिल्ह्यात २ ते ४ जुलैदरम्यान अतिमुसळधार पावसाची शक्यता नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
भारतीय हवामान विभागाच्या ३० जून २०२६ रोजीच्या हवामान बुलेटीननुसार महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टीदरम्यान कमी दाबाचा पट्टा (Off-shore Trough) सक्रिय असून मध्य-ट्रोपोस्फेरिक द्रोणीय रेषा कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाडा दरम्यान पसरली आहे. या हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण कोकणात २ ते ४ जुलैदरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार ते अत्यंत मुसळधार …
Read More »राज्यस्तरीय कृषी पुरस्कार २०२३-२४ चे वितरण नैसर्गिक व तंत्रज्ञानाधारित शेतीत महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करेल- राज्यपाल जिष्णु देव वर्मा
दिवंगत वसंतराव नाईक यांनी शेतकरी आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी दूरदृष्टीने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. सत्तरच्या दशकात महाराष्ट्र भीषण दुष्काळाचा सामना करत असताना त्यांनी कृषी क्षेत्राला नवी दिशा दिली. राज्यात कृषी विद्यापीठांच्या स्थापनेत त्यांचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम येथे …
Read More »महात्मा फुले जनआरोग्य योजनेत फ्लाइंग स्क्वॉडची निर्मिती बेड उपलब्धतेसाठी रिअल-टाइम डॅशबोर्ड – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अनियमिततेवर तात्काळ कारवाई करणारे विशेष फ्लाइंग स्क्वॉड स्थापन करण्यात येणार असून, रुग्णांना कोणत्या रुग्णालयात बेड उपलब्ध आहेत याची माहिती मोबाईलवरच मिळावी यासाठी रिअल-टाइम बेड उपलब्धता डॅशबोर्ड विकसित करण्यात येत असल्याची माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत लक्षवेधी …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, कोल्हापूरच्या हेरे सरंजाम इनाम जमिनींचा प्रश्न निकाली भोगवटादार वर्ग २ जमिनींचे वर्ग १ मध्ये रूपांतर; रूपांतर मूल्य पूर्णपणे माफ
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील हेरे गावातील सरंजाम इनाम जमिनींचा तब्बल ५५ वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न राज्य शासनाने विशेष बाब म्हणून निकाली काढला असून, भोगवटादार वर्ग २ च्या जमिनींचे कोणतेही रूपांतर मूल्य न आकारता भोगवटादार वर्ग १ मध्ये रूपांतर करण्यास मान्यता देण्यात आली असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले. …
Read More »पंकजा मुंडे यांची माहिती, पुण्यातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांवर प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर अंमलबजावणी मुठा नदीचे प्रदुषण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बैठक घेणार
पुणे शहरातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांमुळे मुठा नदीचे प्रदूषण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथे बैठक घेऊन नदी पुनर्जीवन प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तसेच आरएमसी प्रकल्पांच्या प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या प्रकल्पांवर सातत्याने कारवाई केली जात असून, यापुढेही नियमित बैठका घेऊन परिस्थितीवर लक्ष ठेवले जाईल, असे …
Read More »शिवसेना उबाठाच्या उमेदवाराने निवडणूकीतून घेतली माघार, शिंदे शिवसेनेचे सचिन अहिर बिनविरोध निवड नियम, संयम आणि न्यायाच्या बळावर उपसभापतीपदाला नवी उंची देतील"-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
विधान परिषदेच्या उपसभापती पदाकरिता शिंदे शिवसेनेने थेट शिवसेना उबाठा गटातील सचिन अहिर यांना गळ लावला. तसेच सचिन अहिर हे ही त्या गळाच्या सापळ्यात अडकले. आणि त्यांनी लगेच शिवसेना उबाठा गटातून शिंदे शिवसेनेच्या गटात प्रवेश केला. त्याचबरोबर अधिकृत प्रवेश करण्याआधीच सचिन अहिर यांनी विधान परिषदेच्या उपसभापतीकरिता महायुतीकडून उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे …
Read More »राज्यातील सर्व नर्सिंग महाविद्यालयांसाठी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) लागू करणार सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
राज्यातील सर्व नर्सिंग महाविद्यालयांमध्ये शिस्त, नियमितता आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) लागू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत दिली. गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत शासकीय परिचर्या प्रशिक्षण विद्यालयातील ४५ विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याच्या घटनेसंदर्भात सदस्य प्रवीण दटके यांनी उपस्थित …
Read More »
Marathi e-Batmya