Editor

उष्णतेच्या तीव्र लाटेचा हवामान विभागाचा अलर्ट सकाळी ११ ते ४.३० वाजेपर्यंत सार्वजनिक कार्यक्रमाच्या आयोजनास परवानगी नाही, नागपूर व वर्धा जिल्ह्यात १६ ते १८ पर्यंत यलो अलर्ट

हवामान विभागाने विभागातील नागपूर व वर्धा जिल्ह्यात संभाव्य उष्णता लाटेच्या (हीट वेव्ह ) पार्श्वभूमीवर येलो अलर्ट जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, कामगार व नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी यांनी केले आहे. सध्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, उष्णतेच्या लाटेची तीव्रता  विभागात नागपूर व वर्धा जिल्ह्यात अधिक …

Read More »

चंद्रकांत पाटील यांचे निर्देश, ट्यूशन फी, डेव्हलपमेंट फी आणि इतर शुल्काची माहिती सूचना फलक व प्रवेश माहितीपुस्तिकेत नमूद करा प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शुल्काची संपूर्ण माहिती देण्याचे महाविद्यालयांना निर्देश

उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्काबाबत संपूर्ण आणि अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्याचे निर्देश सर्व विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण आणि राज्य सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलसचिवांना दिले आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, नुकताच उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता १२ …

Read More »

आमदार रईस शेख यांची मागणी, पश्चिम बंगाल सारख्या घटना टाळण्यासाठी मविआने टास्कफोर्स स्थापन करावा टास्क फोर्सने मित्रपक्षांच्या आमदारांना प्रशिक्षण द्यावे आणि यादी पडताळणी दरम्यान मतदारांना मदत करावी

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या  सखोल फेरतपासणीची (SIR) घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी महाविकास आघाडी (MVA) नेत्यांना या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी आणि पश्चिम बंगालमध्ये झालेल्या मतदार वगळण्याच्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज्यस्तरीय कृती दल (टास्क फोर्स) स्थापन करण्याचे आवाहन केले. एसआयआर प्रक्रियेमुळे तृणमूल …

Read More »

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा निर्णय, भोजशाळा-कमल मौलाना मशिद परिसर हे तर सरस्वतीचे मंदीर मुस्लिम समाजाला प्रार्थना करण्याची परवानगी देणारा आदेश रद्द करण्याचा निर्णय

विवादित धार्मिक स्थळांवर महत्त्वपूर्ण परिणाम करू शकणाऱ्या एका निकालात, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी धार जिल्ह्यातील भोजशाळा-कमल मौला मशीद परिसर हे एक मंदिर असल्याचा निर्णय दिला.  [हिंदू फ्रंट फॉर जस्टिस विरुद्ध युनियन ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ कल्चर]. न्यायमूर्ती विजय कुमार शुक्ला आणि आलोक अवस्थी यांच्या खंडपीठाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाने कुलदीप सिंग सेंगरबाबत दिलेल्या दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल ठरविला रद्द दिल्ली उच्च न्यायालयाने भाजपाचा माजी आमदार कुलदीप सेंगर याची शिक्षा स्थगित केली होती

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयाचा तो आदेश रद्द केला, ज्याद्वारे २०१७ च्या उन्नाव बलात्कार प्रकरणात [केंद्रीय अन्वेषण विभाग विरुद्ध कुलदीप सिंग सेंगर] भारतीय जनता पक्षाचे (भाजप) माजी आमदार कुलदीप सिंग सेंगर यांची तुरुंगवासाची शिक्षा स्थगित करण्यात आली होती. भारताचे सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने दिल्ली …

Read More »

मंत्रालयासमोर किसान काँग्रेसचे कांदाफेक आंदोलन पोलिसांची आंदोलकांना रोखताना चांगलीच उडाली भंबेरी

राज्यात कांद्याच्या दरात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे शेतकरी संतप्त झाले असून विविध जिल्ह्यांत आंदोलनांची मालिका सुरू झाली आहे. गुरुवारी कांदा दर प्रश्नावर किसान काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत थेट मंत्रालयासमोर कांदाफेक आंदोलन करत राज्य सरकारचा तीव्र निषेध नोंदवला. मंत्रालयात मंत्रिमंडळाची बैठक सुरू असतानाच किसान काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने कांदा उत्पादक शेतकरी मंत्रालयाच्या …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, आदिवासी व डोंगराळ जिल्ह्यांत १७ नवीन व्यावसायिक महाविद्यालयांना मान्यता मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाची बैठक

कौशल्याधारित शिक्षणाला गती देण्यासाठी नवीन कौशल्य केंद्रांना मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात शैक्षणिक वर्ष २०३०-३१ पर्यंत औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या नवीन पदवी व पदविका अभ्यासक्रमाच्या संस्था सुरु करण्यास परवानगी दिली जाणार नाही परंतु ७ आदिवासी, डोंगराळ व मागास जिल्ह्यात नवीन अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, एचएमसीटी, बी. व्होक अभ्यासक्रमांची १७ महाविद्यालये सुरु करण्यास …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे १३ निर्णय १८ पैकी १३ निर्णय पुढील प्रमाणे

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे १८ निर्णय घेण्यात आले. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार आदी उपस्थित होते. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला अनुसूचित जाती आयोगासाठी उपाध्यक्ष पदाची निर्मिती, पाटबंधारेच्या सहा प्रकल्पातून प्रायोगिक तत्त्वावर गाळ काढण्यात येणार, …

Read More »

स्पर्धा परीक्षेसाठी राखीव प्रवर्गासाठीच्या सवलती घेतल्यास खुल्या जागेवरील दावा अमान्य राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

स्पर्धा परीक्षांमध्ये वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परिक्षेस बसण्याची संधी या आधारे सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या नियुक्तीबाबतचे धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयामुळे गुणवत्तेच्या आधारे खुल्या प्रवर्गात निवड होणाऱ्या उमेदवारांबाबत स्पष्टता निर्माण होणार असून आरक्षणाच्या अंमलबजावणीत अधिक पारदर्शकता आणि सुसंगती …

Read More »

इंधन बचतीसाठी महावितरणचे एक पाऊल पुढे! पेट्रोल व डिझेलऐवजी विद्युत वाहनांचा वापर सुरु

पश्चिम आशियाई संकटाच्या पार्श्वभूमिवर इंधन बचतीसाठी पेट्रोल व डिझेलऐवजी विद्युत वाहनांचा वापर करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यास महावितरणने कृतीशिल प्रतिसाद दिला असून अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्यासह सर्व संचालक आणि कार्यकारी संचालकांनी विद्युत वाहनांचा वापर सुरु केला आहे. दरम्यान सर्व संचालकांसाठी गुरूवारी …

Read More »