Editor

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्यात जुंपली दक्षिण-उत्तर भारत च्या विभाजना वरून टीका

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी रविवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यावर उत्तर-दक्षिण विभाजनाला खतपाणी घातल्याचा आरोप करत जोरदार टीका केली. रेवंत रेड्डी यांना देशाचे विभाजन न करण्याचे आवाहन केले आणि प्रदेश कोणताही असो, प्रत्येकजण भारतीय आहे, असे ठामपणे सांगितले. एका व्हायरल व्हिडिओवर रिजिजू प्रतिक्रिया देत होते, ज्यामध्ये रेवंत रेड्डी यांनी …

Read More »

घरगुती गॅसच्या किंमतीत २९ रुपयांनी वाढ तीन महिन्यातील ही दुसरी दरवाढ

भारतात घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत आजपासून प्रति सिलिंडर २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यांतील ही दुसरी दरवाढ आहे. पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक स्तरावर वाढलेले ऊर्जेचे दर पेलणे सरकारी तेल कंपन्यांना कठीण जात असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या वाढीमुळे दिल्लीत १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत …

Read More »

डोनाल्ड ट्रम्प यांची स्पष्टोक्ती, अंतिम करार झाल्यानंतरच इराणची मालमत्ता मुक्त करणार अल्पकालीन करारासाठी लेबनॉनची अट नाही

इराणवरील निर्बंध शिथिल होण्याची शक्यता पूर्णपणे संपुष्टात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, अंतिम करार होईपर्यंत त्यांचे प्रशासन इराणची मालमत्ता गोठवण्यापासून मुक्त करणार नाही किंवा आर्थिक निर्बंध हटवणार नाही. त्यांनी हे देखील स्पष्ट केले की, तेहरानसोबतच्या कोणत्याही अल्पकालीन करारासाठी लेबनॉनची अट नाही. एनबीसी न्यूजच्या ‘मीट द प्रेस’ला …

Read More »

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावेळी जंतर-मंतरवर नेमके काय दिसले अभिजीत दिपके, सोनाम वांगचुक आल्यावर नेमकी काय भूमिका मांडली

शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास, नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे शेकडो आंदोलकांच्या गर्दीत एक ८३ वर्षीय महिला उभी होती. उन्हाचा तडाखा वाढू लागला होता. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनात त्या का आल्या होत्या, या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे तयार होते. त्यांची स्वतःची मुले केव्हाच शिक्षण पूर्ण करून स्थिरावली होती, पण त्यांना आपल्या नातवंडांच्या भविष्याची …

Read More »

स्फोटके नियम २००८ मध्ये सुधारणेसाठी राज्य शासन केंद्राला प्रस्ताव सादर करणार जीवितहानी टाळण्यासाठी स्वयंचलित यंत्रणेवर भर · मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादरीकरण

नागपूर जिल्ह्यात मागील अडीच वर्षात स्फोटकांच्या कंपन्यांमधील अपघातांमध्ये जीवितहानीच्या घटना लक्षात घेता स्फोटके नियम २००८ मध्ये सुधारणा सुचविणारा प्रस्ताव राज्य शासन केंद्राला सादर करणार आहे. या प्रस्तावाच्या मसुद्यात जीवितहानी टाळण्यासाठी कंपन्यांमध्ये स्वयंचलित प्रक्रियेसह सुरक्षेशी संबंधित जागतिक मानकांचा अवलंब करण्याच्या शिफारसी सुचविण्यात आल्या आहेत. रामगिरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर जिल्हा …

Read More »

साहेबराव कांबळेंसह शेकडो कार्यकर्त्यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश राज्यभरातून प्रवेशाचा ओघ सुरूच, शिवसेनेची ताकद वाढली

राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. विधान परिषदेचे काँग्रेसचे माजी उमेदवार साहेबराव कांबळे यांच्यासह उमरखेड-महागाव विधानसभा मतदारसंघातील शेकडो पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून होत असलेल्या पक्षप्रवेशांमुळे …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी दर्जेदार पायाभूत सुविधांवर भर आगामी खासदार क्रीडा महोत्सव विदर्भस्तरीय, खासदार क्रीडा महोत्सवाची सांगता

नागपुरात व्यापक स्तरावर क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येत आहे. या सोयी-सुविधांमुळे क्रीडा क्षेत्रात मनुष्यबळ तयार होण्यास मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नागपुरात आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. कविवर्य सुरेश भट सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले …

Read More »

राज्यभर प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व तत्सम अन्नपदार्थ विक्रेत्यांवर १९५ धाडी १ कोटी ९९ लाख १८ हजार ४७५ रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त, १९२ व्यक्तींना अटक

राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाची प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व तत्सम अन्नपदार्थांविरुद्धची विशेष मोहीम प्रभावीपणे सुरू आहे. १ ते ५ जून २०२६ या कालावधीत करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल १९२ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. या पाच दिवसांच्या कालावधीत राज्यभर १९५ धाडी टाकण्यात आल्या असून या कारवाईत १ कोटी ९९ लाख …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, राज्यात मानसिक आरोग्य सेवांचे जाळे अधिक मजबूत करणार मानसिक आरोग्य सेवांसाठी स्वयंसेवी संस्थांशी सामंजस्य करारास मंजुरी

राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागांपर्यंत मानसिक आरोग्य सेवा प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये ‘उडान’ प्रकल्पांतर्गत मानसिक आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने सार्वजनिक आरोग्य विभाग आणि दोन स्वयंसेवी संस्थांमध्ये पाच वर्षांसाठी सामंजस्य करार …

Read More »

१५ जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी मान्सून कोकणात दाखल झाला, पण सर्वदूर सक्रिय नाही; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये ९ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर किमान १५ जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता हवामानाच्या सध्याच्या अंदाजातून दिसून येत आहे. त्यामुळे या कालावधीत राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता …

Read More »