Breaking News

बविआने पैशासोबत पकडल्यानंतर विनोद तावडे यांचा खुलासा, मी कार्यकर्त्यांना…. विवांता हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शनासाठी आलो होतो

बहुजन विकास आघाडीचे क्षितिज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर यांनी भाजपाचे केंद्रीय महासचिव विनोद तावडे यांना पैशाच्या बॅगेसह आणि पाकिटासह विवांता हॉटेलमध्ये पकडल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर पुढील कारवाई होण्याआधीच विनोद तावडे यांनी एका प्रसारमाध्यमाला खुलासा केला. विनोद तावडे यांनी यावेळी सांगितले की, भाजपाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलो होतो असे स्पष्टीकरण …

Read More »

बहुजन विकास आघाडीने विनोद तावडे यांना ५ कोटी आणि नावाच्या डायरीसह पकडले विवांता हॉटेलमध्ये झाला राडा

राज्यातील विधानसभा निवडणूकीचा प्रचार थंडावल्यानंतर निवडणूक आयोगाने पुढील ४८ तास सर्वच राजकिय पक्षांना मतदारांना प्रलोभने दाखविण्यापासून ते छुपा प्रचार करण्यापासून रोखणारा आदेश जारी केला. आम्ही कायद्याने चालणारी आणि मतदारांना कोणतेही प्रलोभने दाखवत नसल्याचा कांगावा करणाऱ्या भाजपाचे केंद्रीय महासचिव विनोद तावडे यांना विरारचे आमदार हितेंद्र ठाकूर यांचे सुपुत्र क्षितीज ठाकूर आणि …

Read More »

एलोन मस्कच्या कंपनीच्या मदतीने इस्रोने पाठविला अंतराळात उपग्रहः ब्रॉडबॅण्ड सेवा सुधारणा स्पेसएक्स फॉल्कन ९ रॉकेटमधून पाठवले यान

भारताचा सर्वात प्रगत दळणवळण उपग्रह, GSAT-20 किंवा GSAT N-2, मंगळवारी मध्यरात्री एक वाजून एक मिनिटांनी, केप कॅनाव्हरल, फ्लोरिडा येथून स्पेसएक्स फाल्कन ९ SpaceX Falcon 9 रॉकेटमधून अंतराळात यशस्वीरित्या झेपावला. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो ISRO साठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे, ज्याने त्यांच्या व्यावसायिक शाखा, न्यू स्पेस इंडिया लिमिटेड …

Read More »

सरकारी आयटीआय कंपनी कंपनीला मिळाले ९५ कोटींचे कंत्राट बाजारात सर्वाधिक चर्चा आयटीआयचीच

पीयुसी कंपनी PSU ने खनन डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड सर्व्हिलन्स सिस्टीम (MDTSS) प्रकल्पासाठी उत्तराखंड सरकारच्या भूविज्ञान आणि खाण संचालनालयाकडून सुमारे ९५ कोटी रुपयांचा करार मिळाल्यानंतर आयटीआय लि. ITI Ltd चे शेअर्स आज चर्चेत आहेत. आय़टीआ ITI स्टॉक बीएसईवर आधीच्या २९२.२० रुपयांच्या बंदच्या तुलनेत सोमवारी २९१.२५ रुपयांवर फ्लॅट नोटवर बंद झाला. कंपनीचे …

Read More »

डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या कंपन्याकडून मिळणार डिव्हिडंड कोचीन शिपयार्डसह ओएनजीसी कंपन्यांचे मिळणार डिव्हिडंड

दोन डझन कंपन्यांचे शेअर्स मंगळवारी एक्स-डिव्हिडंड बदलतील. त्यात कोचीन शिपयार्ड लिमिटेड, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ओएनजीसी), एशियन पेंट्स लिमिटेड, एमआरएफ लिमिटेड, इन्फो एज लिमिटेड, अकझो नोबेल इंडिया लिमिटेड आणि अशोक लेलँड लिमिटेड यांचा समावेश आहे. इतरांमध्ये प्रॉक्टर अँड गॅम्बल हायजीन अँड हेल्थ केअर, नवनीत एज्युकेशन, वैभव यांचा समावेश …

Read More »

बदलापूर चकमक प्रकरणी तपासातील त्रुटींवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह तपासाकडे राज्य सीआयडी गंभीरतेने पाहत नाही – उच्च न्यायालय

बदलापूर शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेंच्या कथित चकमकीच्या तपासातील त्रुटींवर उच्च न्यायालयाने सोमवारी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच, या तपासाबाबत राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) गंभीरतेने पाहत नाही, अशा शब्दात न्यायालयाने सीआयडीच्या तपासावर नाराजी व्यक्त करून तपास पूर्ण करण्यासाठी सीआयडीला दोन आठवड्यांची मुदत दिली. या संवेदनशील …

Read More »

न्यायालयाच्या आदेशाकडे काणाडोळा करू नका, राज्य सरकार आणि पालिकेला फटकारले बेकायदा फलक प्रकरणी उच्च न्यायालयाची तंबी

राज्यातील वाढत्या फलकबाजीबाबत उच्च न्यायालयाने वेळोवेळी आदेश देऊनही त्याकडे महापालिका, आणि नगरपालिका काणाडोळा करीत असून त्या आदेशाला गांभीर्याने घेत नाहीत, पालिका आयुक्तांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले असतानाही पालिका अतिरिक्त, सहआयुक्तांच्या वतीने प्रतिज्ञापत्र दाखल केले जाते. त्यामुळे बेकायदा फलकबाजीकडे गांभीर्याने पहा, अन्यथा न्यायालयाला कठोर कारवाईला सामोरे जा, अशा शब्दात उच्च …

Read More »

अँटिलिया स्फोटकं आणि मनसुख हिरण हत्या प्रकरण आरोपीला जामीन नाहीच आरोपी सुनील मानेचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने जामीन फेटाळला

अँटिलिया स्फोटकं आणि व्यापारी मनसुख हिरेन हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या माजी पोलीस सुनील मानेविरोधात प्रथमदर्शनी पुरावे असल्याचे नमूद करून उच्च न्यायालयाने सोमवारी जामीन नाकारला. आरोपीविरोधात दाखल गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून त्याच्याविरोधात पुरेसे पुरावे आहेत. प्रकरणाच्या टप्प्यात अर्जदाराला जामीन दिल्यास तो साक्षी पुराव्यांशी छेडछाड करू शकतो, असे निरीक्षण न्या. रेवती मोहिते-डेरे आणि …

Read More »

राजकिय पक्षांच्या प्रचार तोफा थंडावल्या, निवडणूक आयोगाने जारी केला महत्वाचा आदेश राजकीय प्रचार, प्रसारावर बंदी नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई

राज्यातील विधानसभा निवडणूकांच्या निमित्ताने सुरु असलेल्या सर्वपक्षिय प्रचाराच्या तोफा थंडावल्या. मागील २० ते २५ दिवसापासून राज्यातील सर्वच राजकिय पक्षांकडून सातत्याने आपपाल्या प्रतिस्पर्धी पक्षावर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत होते. विधानसभा निवडणूकीत महायुतीच्या वतीने भाजपाच्या केंद्रीय नेत्यांनी पुन्हा एकदा धार्मिक आधारावर मते मागण्याचा अजेंडा निश्चित करण्याचा प्रयत्न केला. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपाचा …

Read More »

मुंबई शहर जिल्ह्यातील दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांकरिता मोफत वाहन व्यवस्था • समन्वय अधिकारी व रूट प्लानची माहिती मिळण्यासाठी क्युआर कोडची निर्मिती

विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात बुधवार, २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ०७.०० ते सायंकाळी ०६.०० या वेळेत मतदान होणार आहे. ‘एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये’ (No voters to be left behind) या निवडणूक आयोगाच्या घोषणेप्रमाणे मतदानाच्या दिवशी दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांची मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी …

Read More »