राज्यातील विधानसभा निवडणूकीचा प्रचार थंडावल्यानंतर निवडणूक आयोगाने पुढील ४८ तास सर्वच राजकिय पक्षांना मतदारांना प्रलोभने दाखविण्यापासून ते छुपा प्रचार करण्यापासून रोखणारा आदेश जारी केला. आम्ही कायद्याने चालणारी आणि मतदारांना कोणतेही प्रलोभने दाखवत नसल्याचा कांगावा करणाऱ्या भाजपाचे केंद्रीय महासचिव विनोद तावडे यांना विरारचे आमदार हितेंद्र ठाकूर यांचे सुपुत्र क्षितीज ठाकूर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी वसई विरार मधील विवांता हॉटेलमध्ये पाच कोटीच्या रोख रकमेसह पकडले.
यावेळी विनोद तावडे आणि त्यांचे समर्थक कार्यकर्त्ये विवांता हॉटेलच्या एक रूममध्ये तर ज्यांना पैसे देण्यात येणार होते. त्या महिला मतदारांना दुसऱ्या रूमध्ये बोलावले होते. यावेळी क्षितिज ठाकूर यांनी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना घेऊन विवांता लॉजमध्ये गेले आणि तेथे विनोद तावडे हे ज्या खोलित होते, तेथे धडक दिली. त्यावेळी विनोद तावडे यांच्याकडे रोख रकमेची पाकिटे आणि ५ कोटी रूपयांची रक्कम आढळून आणली. यावेळी विनोद तावडे यांनी बॅगेतील रक्कम बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काढून दाखविली. तसेच बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना घेराव घालत पैसे वाटपाबाबत जाब विचारला. तसेच यावेळी विनोद तावडे आणि माजी आमदार क्षितीज ठाकूर यांच्यात काही प्रमाणात शाब्दीक बाचाबाचीही झाली.
यावेळी या घटनेनंतर विनोद तावडेकडील पैसे असलेली बॅग त्यावेळी तेथे पोहोचलेल्या पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतली. मात्र पोलिसांनी तावडे यांना ताब्यात घेतली नाही. दरम्यानच्या काळात विनोद तावडे हे सातत्याने कोणाला तरी फोन करत होते. कालांतराने बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर हेही यावेळी विवांता हॉटेलवर पोहोचले.
त्यानंतर बहुजन विकास आघडीचे हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे यांच्यातही काही काळ शाब्दीक चकमक उडाल्याचे दिसून आले. दरम्यान, या विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार राजन नाईक यांना बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कपडे फाटेपर्यंत चोप दिल्याचे बहुजन विकास आघाडीच्या एका कार्यकर्त्याने सांगितले.
यावेळी विनोद तावडे यांच्यासोबत एक डायरीही सापडली असून त्या डायरीत काही महिलांची नावे आणि त्या नावासमोर आकडे लिहिल्याचे दिसून आले.
Marathi e-Batmya