बहुजन विकास आघाडीचे क्षितिज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर यांनी भाजपाचे केंद्रीय महासचिव विनोद तावडे यांना पैशाच्या बॅगेसह आणि पाकिटासह विवांता हॉटेलमध्ये पकडल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर पुढील कारवाई होण्याआधीच विनोद तावडे यांनी एका प्रसारमाध्यमाला खुलासा केला. विनोद तावडे यांनी यावेळी सांगितले की, भाजपाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलो होतो असे स्पष्टीकरण दिले.
यावेळी विनोद तावडे म्हणाले की़, उद्या मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. तर त्यात मतदारांचा टक्का कसा वाढेल आणि मतदारांचा सहभाग कसा वाढेल यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांची छोटेखानी बैठक ठेवली होती. त्या बैठकीसाठी मी विवांता हॉटेलमध्ये आलो होतो असे स्पष्टीकरणही यावेळी दिले.
पुढे बोलताना विनोद तावडे म्हणाले की, बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्त्ये तेथे आले आणि त्यांचा गैरसमज झाला की, मी पैसे वाटतो आहे. पण याप्रकरणी आता निवडणूक आयोग आणि पोलिस पुढील तपास करत आहेत. हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजही आहे. मी गेली ४० वर्षे राजकारणात आहे. जे सत्य आहे. ते समोर आहे. माझी सुद्धा मागणी आहे की, या प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे असेही यावेळी सांगितले.
विरार मधील मनोरीपाडा येथे भाजपाचे केंद्रीय महासचिव विनोद तावडे हे आज सकाळी उतरले होते. भाजपाच्या या मतदारसंघातील उमेदवारांची भेट घेण्याकरीता विनोद तावडे हे आल्याचं सांगितलं जात होत. नेमक्या त्याच वेळी बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्त्यांनी या हॉटेलमध्ये प्रवेश केला आणि विनोद तावडे यांना घेराव घातला. या कार्यकर्त्यांकडून विनोद तावडे हे पैसे वाटप करण्यासाठी आल्याचा आरोप करण्यात आला. तसेच कुणाला किती पैसे दिले, द्यायचे आहेत, याची नावे असलेली आणि त्यापुढे आकडे असलेली डायरीही यावेळी विनोद तावडे यांच्यासोबत आढळून आली.
दरम्यान, बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले, विनोद तावडे हे ५ कोटी रूपये घेऊन येत आहेत अशी माहिती भाजपावाल्यानीच मला दिली होती. मात्र केंद्रात नेता असलेल्या नेता इतक्या छोट्या कामासाठी येत असेल मला वाटले नव्हते. मात्र जाऊन बघितले तर विनोद तावडे हे पैसे वाटप सुरु होतं. तसेच कार्यकर्त्येही आहेत, डायऱ्यांमध्ये नोंदी करण्याचे कामही सुरु होत असे सांगितले.
Marathi e-Batmya