अँटिलिया स्फोटकं आणि मनसुख हिरण हत्या प्रकरण आरोपीला जामीन नाहीच आरोपी सुनील मानेचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने जामीन फेटाळला

अँटिलिया स्फोटकं आणि व्यापारी मनसुख हिरेन हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या माजी पोलीस सुनील मानेविरोधात प्रथमदर्शनी पुरावे असल्याचे नमूद करून उच्च न्यायालयाने सोमवारी जामीन नाकारला.

आरोपीविरोधात दाखल गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून त्याच्याविरोधात पुरेसे पुरावे आहेत. प्रकरणाच्या टप्प्यात अर्जदाराला जामीन दिल्यास तो साक्षी पुराव्यांशी छेडछाड करू शकतो, असे निरीक्षण न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने मानेला जामीन नाकारताना निरीक्षण नोंदवले.

एनआयएने सादर केलेल्या पुराव्यावरून प्रथमदर्शनी मृत मनसुख हिरेनचा काटा काढण्याचा पूर्वनियोजित आणि मोठा कट रचला गेल्याचे स्पष्ट होते. अद्याप पुढील तपास सुरू असून आम्हाला विश्वास आहे की एनआयए या तपासाला तार्किक शेवटपर्यंत नेईल आणि मृताच्या कुटुंबाला न्याय मिळेल , असेही न्यायलयाने आदेशात नमूद केले.

मनसुख हिरेन यांच्या हत्येमध्ये अर्जदार मानेचा सहभाग दर्शवण्यासाठी पुरेसे पुरावे आहेत. माने हे पोलीस असल्याने त्यांनी साक्षी पुराव्यांशी छेडछाड करतील ही शक्यता नाकारता येत नाही. युएपीए कायद्याच्या कठोर तरतुदींखालील दाखल गुन्हे खूपच गंभीर आहेत. त्यामुळे या टप्प्यावर अर्जदाराला जामिनावर सोडणे अजिबात न्याय्य आणि योग्य ठरणार नही, असेही खंडपीठाने जामनी अर्ज नाकारता स्पष्ट केले.

आपल्याविरुद्ध कोणताही पुरावा नसल्याचा दावा करत माने यांनी उच्च न्यायालयात जामीन अर्ज केला होता. २५ फेब्रुवारी २०२१ रोजी दक्षिण मुंबईतील अंबानींच्या घर ‘अँटिलिया’जवळ पार्क केलेल्या स्फोटकांनी भरलेल्या वाहनाचा मालक असलेला हिरेनच्या हत्येच्या कटाचा माने हा भाग असल्याचा दावा एनआयएने केला आहे.

About Editor

Check Also

मुंबईतील १२ अग्निशमन अधिकारी, जवानांना राष्ट्रपती पदके प्रदान राज्यपालांच्या हस्ते अग्निशमन सेवा सप्ताहाचे उदघाटन

राष्ट्रीय अग्निशमन दिनानिमित्त आज राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकभवन मुंबई येथे अग्निशमन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *