मलायका अरोराच्या मराठमोळ्या लूकवर चाहते फिदा वयाच्या ५० व्या वर्षी देखील दिवसागणिक वाढतंय मलायकाचं सौंदर्य

जुन्या दशकातील बॉलिवूडच्या अभिनेत्रींचं सौंदर्य दिवसेंदिवस वाढत आहे. अभिनेत्री कायम चाहत्यांना सुंदर दिसण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी अनेक उपयुक्त माहिती चाहत्यांना देत असतात. आता देखील अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या सौंदर्याची चर्चा रंगताना दिसून येत आहे. सध्या सोशल मीडियावर मलायका हिचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

सदर व्हिडीओमधील मलायका अरोराच्या माराठमोळ्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून चाहते फिदा झाले आहेत. वयाच्या ५० व्या वर्षी देखील मलायका हिचं सौंदर्य कमी झालेलं नाही. मलायका कायम तिच्या फिटनेस आणि सौंदर्यामुळे चर्चेत असते. मराठमोळ्या अंदाजात मलायका हिचं सौंदर्य फुलून दिसत आहे. झी मराठीच्या कार्यक्रमात हजेरी लावताना तिचा मराठमोळा लुक समोर आला होता.

मलायका अरोरा बॉलिवूडच्या अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मलायका तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. सध्या मलायका तिच्या आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्या बरोबर असलेल्या रिलेशनशिप मुळे चांगलीच चर्चेत आहे. तसेच सोशल मीडियावर मलायका हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

सध्या सोशल मीडियावर मलायका हिच्या लूकची चर्चा रंगत आहे. व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये ‘पारंपरिक ते अधिक सुंदर!’ असं लिहिलं आहे. चाहते देखील मलायका हिच्या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. मलायका चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

 

About Marathi E Batmya

Check Also

Fatima Bosch of Mexico is Miss Universe 2025

मिस युनिव्हर्स २०२५ चा मुकुट मेक्सिकोच्या फातिमा बॉशने पटकावला

मिस युनिव्हर्स २०२५ चा ग्रँड फिनाले थायलंडमध्ये संपन्न झाला, जगाचे लक्ष या रोमांचक स्पर्धेवर केंद्रित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *