रजनीकांत यांच्या या चाहत्याने थेट देवघरात केली मूर्तीची स्थापना हा चाहता रजनीकांतची करतो देवासारखी पूजा

रजनीकांत यांचे चाहते भारतात नाही तर जगभर पसरलेले आहेत. थलैवासाठी त्याचे चाहते काहीही करायला तयार आहेत. रजनीकांतचा कोणताही चित्रपट प्रदर्शित झाला की, चाहते फुलं आणि दुधापासून अभिनेत्याच्या पोस्टरपर्यंत सर्व काही देतात. त्याच वेळी आता रजनीकांतच्या एका चाहत्याने त्यांचे मंदिर बांधले आहे, जिथे अभिनेत्याची नियमित पूजा केली जाते.

समोर आलेल्या माहितीनुसार मदुराईत रजनीकांतचे मंदिर बांधले रजनीकांतचा चाहता कार्तिकने तमिळनाडूच्या मदुराईमध्ये सुपरस्टारच्या सन्मानार्थ मंदिर बांधले आहे आणि आता तो त्याच्या या कृत्यामुळे चर्चेत आहे. थलैवाच्या या मंदिरात त्यांची सुमारे २५० किलो वजनाची मूर्ती बसवण्यात आली आहे. कार्तिकने आपल्या घराचा काही भाग रजनीकांत यांना मंदिर बांधण्यासाठी दिला असून देवासारखी त्यांची पूजा करतो.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना चाहत्याने रजनीकांतचे कौतुक केले आणि त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. कार्तिकने अभिनेत्याची देवाशी तुलना केली आणि म्हटले की थलैवाचे हे मंदिर त्याच्या आदराचे प्रतीक आहे. कार्तिक हा रजनीकांतचा इतका मोठा चाहता आहे की तो फक्त त्यांचे चित्रपट पाहतो आणि इतर कोणत्याही अभिनेत्याला फॉलो करत नाही. रजनीकांतच्या या मंदिराबाबत त्यांची मुलगी अनुसूया म्हणाली की, ते थलैवाची पूजा पारंपारिक मंदिरात होत असलेल्या पूजा पद्धतीनेच करतात.

About Marathi E Batmya

Check Also

Fatima Bosch of Mexico is Miss Universe 2025

मिस युनिव्हर्स २०२५ चा मुकुट मेक्सिकोच्या फातिमा बॉशने पटकावला

मिस युनिव्हर्स २०२५ चा ग्रँड फिनाले थायलंडमध्ये संपन्न झाला, जगाचे लक्ष या रोमांचक स्पर्धेवर केंद्रित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *