शाहरुख खान याच्या मालकीची सर्वात महागडी कार कोणती? वाढदिवसानिनित शाहरुख खान याच्या कार कलेक्शन विषयाने जाणून घेऊया

शाहरुख खानच्या चाहत्यांच्या नजरा त्याच्या पुढच्या ‘डंकी’ या चित्रपटावर खिळल्या आहेत. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, चित्रपट निर्माते आज शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त डंकीचा टीझर रिलीज करू शकतात. आज शाहरुख खानच्या ५८ व्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला किंग खानबद्दल खास माहिती देणार आहोत.

कोट्यवधी रुपये मानधन घेणाऱ्या किंग खानकडे कोणत्या गाड्या आहेत किंवा शाहरुखच्या कार कलेक्शनमधील सर्वात स्वस्त आणि महागडी कार कोणती आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? तर चला जाणून घेऊया

रोल्स रॉयस फॅंटम ड्रॉपहेड कूप

तुम्हाला माहित आहे का की किंग खानकडे रोल्स रॉयस कंपनीच्या एक नाही, तर दोन आलिशान कार आहेत. शाहरुख खानच्या गॅरेजमध्ये पार्क केलेल्या या कारची किंमत सुमारे 7 कोटी रुपये आहे. इंजिनबद्दल बोलायचे झाले तर या कारमध्ये ६.८ लीटर V१२ इंजिन आहे, जे ४५९ hp ची पॉवर आणि ७५० Nm टॉर्क जनरेट करते.

रोल्स रॉयस कलिनन ब्लॅक बॅज

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पठाण चित्रपटाच्या यशानंतर शाहरुखने ही कार आपल्या कार कलेक्शनमध्ये समाविष्ट केली होती. वृत्तांवर विश्वास ठेवला, तर शाहरुख खानने ही कार खरेदी करण्यासाठी सुमारे १० कोटी रुपये (ऑन-रोड) खर्च केले आहेत.

बुगाटी वेरॉन

ही कार किंग खानच्या कार कलेक्शनमधील सर्वात महागडी कार असल्याचे बोलले जाते. अहवालांवर विश्वास ठेवला, तर या कारची किंमत जवळपास १२ कोटी रुपये आहे. या कारची खास गोष्ट म्हणजे ही कार फक्त २.५ सेकंदात ० ते १०० पर्यंत वेग पकडते आणि या कारचा टॉप स्पीड ४०० kmph आहे.

About Marathi E Batmya

Check Also

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंती दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावरील सांस्कृतिक कार्यक्रमाचे ३१ मे रोजी रवींद्र नाट्यमंदिरात आयोजन

लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक कार्य संचालनालयांच्या वतीने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *