महाराष्ट्राला मिळाला ७ हजार २२ कोटींचा अतिरिक्त कर निधी केंद्र सरकारकडून राज्यांना १ लाख हजार कोटींचे कर वितरण

राज्यांच्या वित्तीय व्यवस्थेला बळकटी देत विकासकामांना अधिक गती मिळावी, या उद्देशाने केंद्र सरकारने आज सर्व राज्यांना १ लाख ९ हजार कोटी रुपयांच्या कर वितरणाचा अतिरिक्त अग्रीम हप्ता वितरीत केला आहे. राज्यनिहाय वाटपानुसार, महाराष्ट्राला ७ हजार २२ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी प्राप्त झाला आहे.

केंद्र शासनाने ही रक्कम १० ऑगस्ट रोजी होणाऱ्या नियमित मासिक कर हस्तांतरणाव्यतिरिक्त वितरित केली आहे. या अतिरिक्त निधीमुळे राज्यांना पायाभूत सुविधा उभारणी, विविध विकास प्रकल्प, भांडवली खर्च तसेच प्राधान्याच्या लोककल्याणकारी योजनांसाठी आवश्यक आर्थिक तरतूद अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. यामुळे विकासकामांच्या अंमलबजावणीला गती मिळण्यास आणि निधी नियोजन अधिक सक्षमपणे करण्यास मदत होणार आहे.

महाराष्ट्राला प्राप्त ७ हजार २२ कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीमुळे राज्यातील विविध विकास प्रकल्प आणि पायाभूत सुविधांच्या कामांना अधिक चालना मिळणार आहे.

About Editor

Check Also

महागाईचा दर ५.५४% वर टक्क्याने, ऑगस्ट महिन्यात ४.८३% वर होता प्रतिकूल बेस इफेक्ट'नेही (base effect) मुख्य महागाई दर वाढ

रिझर्व्ह बँकेने (RBI) साडेतीन वर्षांहून अधिक काळानंतर पहिल्यांदाच व्याजदर वाढवल्यानंतर काही दिवसांतच, सप्टेंबरमध्ये भारताचा मुख्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *