टाटाची व्यावसायिक वाहने १ ऑक्टोबरपासून महागणार यंदा चौथ्यांदा वाहनांच्या किमती वाढल्या

टाटा मोटर्सने आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. वाढीव किमती १ ऑक्टोबरपासून लागू होतील. तुम्हाला टाटा व्यावसायिक वाहने खरेदी करायची असतील, तर तुम्हाला ती ३० सप्टेंबरपर्यंत कमी किमतीत खरेदी करण्याची संधी आहे. यानंतर कंपनीची ही वाहने महाग होणार आहेत.

कंपनीने आपल्या एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले की, विविध मॉडेल्स आणि व्यावसायिक वाहनांच्या व्हेरियंटच्या किमती सरासरी ३ टक्के वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा मोटर्सने किमती वाढवण्याचे कारण दिले आहे. कंपनीने म्हटले की एकूण इनपुट कॉस्ट म्हणजेच कारच्या मेकिंग कॉस्टमध्ये वाढ झाल्यामुळे कंपनीने प्रवासी वाहनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

कंपनीने यावर्षी चौथ्यांदा आपल्या वाहनांच्या किमती वाढवल्या आहेत. याआधी ३ जुलै रोजी कंपनीने प्रवासी कारच्या किमती वाढवण्याची घोषणा केली होती. कंपनीने १७ जुलैपासून वेगवेगळ्या मॉडेल्स आणि कारच्या व्हेरिएंटच्या किमती ०.६ टक्के वाढवल्या होत्या. गेल्या वेळीही खर्च वाढल्याने भाव वाढले होते.

कंपनीने याआधी आपली वाहने नवीन उत्सर्जन नियमांचे पालन करण्यासाठी घटकांमध्ये बदल केले होते. या कारणास्तव १ एप्रिलपासून व्यावसायिक वाहनांच्या किमती ५ टक्क्यांनी वाढवण्यात आल्या आहेत. त्याच वेळी फेब्रुवारीमध्ये टाटा मोटर्सने त्यांच्या सर्व ICE प्रवासी वाहनांच्या किमती सरासरी १.२ टक्के वाढवण्याची घोषणा केली होती.

About Editor

Check Also

आरबीआयचा अहवाल म्हणतो, देशातून बाहेर जाणाऱ्या डॉलरचे प्रमाण जास्त येणाऱ्या डॉलर्सपेक्षा ३०.८ अब्ज डॉलर्सने जास्त जाणारी रक्कम

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अर्थात आरबीआय (RBI) ताज्या आकडेवारीवरून हे दिसून येते की, देशातून बाहेर जाणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *