व्होडाफोन आयडिया ला एचडीएफसी बँकेने दिला आधार व्होडाफोन आयडिया कंपनीच्या मदतीला धावून आली एचसीएफसी बँक

व्होडाफोन आयडिया या दूरसंचार कंपनीला देशातील सर्वात मोठी बँक एचडीएफसी बँकेकडून आधार मिळाला आहे. बँकेनं परवाना शुल्क भरण्यासाठी आणि ५G स्पेक्ट्रमच्या देयकाशी संबंधित बाबींची पूर्तता करण्यासाठी व्होडाफोन आयडियाला २ हजार कोटी रुपयांचे कर्ज दिलं आहे. हे कर्ज दोन वर्षांसाठी असून ते सप्टेंबरच्या मध्यात टेलिकॉम कंपनीला देण्यात आलं होतं.

एका मीडिया रिपोर्टनुसार, हे कर्ज कंपनीच्या काही कर्ज आणि स्टॅटुअरी पेमेंट कमिटेमेंटच्या अंतिम मुदतीपूर्वी मिळालं होतं. कंपनीनं यापूर्वीच आर्थिक वर्ष २०२२ आणि आर्थिक वर्ष २०२३ साठी परवाना शुल्क म्हणून ३५० कोटींहून अधिक आणि स्पेक्ट्रम युजेज शुल्क म्हणून सुमारे १ हजार ७०० कोटी रुपये भरले आहेत. कंपनी आता इक्विटी फंडिंगसाठी गुंतवणूकदारांशी बोलणी करत आहे.

व्होडाफोन आयडियाच्या प्रमोटर ग्रुप कंपनीनं व्हिआयला २ हजार कोटी रुपयांचे आश्वासन दिलं आहे. प्रवर्तक समूह कंपनीनं व्होडाफोन आयडियाला सांगितले की पेमेंट दायित्वे हाताळण्यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता असल्यास ती २ हजार कोटी रुपयांची मदत देण्यास तयार आहे. टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आयडियानं १४ ऑगस्ट रोजी एका एक्सचेंज फाइलिंगमध्ये याचा खुलासा केला होता.

 

About Marathi E Batmya

Check Also

रघुराम राजन यांनी भारताच्या सेमीकंडक्टर संस्थेच्या उभारणीवर उपस्थित केला प्रश्न भारत देशांतर्गत उद्योग विकसित करण्यासाठी 'अब्जावधी' रुपये का ओतत आहे

औद्योगिक उपक्रमांवर टीका करणारेही असतात, पण ‘जेव्हा तुम्ही तस्करी करू शकता, तेव्हा बांधकाम का करायचे?’ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *