आता भारत बायोटेकनेही केली लसीच्या किंमतीत कपात २०० रूपयांची कपात केल्याची ट्विटरद्वारे माहिती

मुंबई :प्रतिनिधी

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रात मोफत लसीकरणाची घोषणा करताच सीरम इस्टीट्युटने कोविशील्ड लसीच्या किंमतीत प्रती डोस १०० रूपयाने कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ आता भारत बायोटेकनेही आपल्या प्रती डोसच्या किंमतीत थेट २०० रूपयांनी कपात करत ६०० रूपयांची लस आता ४०० रूपयात राज्य सरकारला विकणार असल्याची माहिती भारत बायोटेकने ट्विटरद्वारे दिली.

भारत बायोटेक कंपनी या महिन्यात आणि पुढील महिन्यात प्रत्येकी १० लाख डोस महाराष्ट्राला उपलब्ध करून देणार आहे. तर जूलै महिन्यात २० लाख लस डोस उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राला मिळणाऱ्या लसी या ४०० रूपये दराने उपलब्ध होणार आहेत. सीरम पाठोपाठ आता भारत बायोटेकनेही आता आपल्या लसीच्या दरात कपात केल्याने राज्यातील लस खरेदीच्या पैसे काही प्रमाणात वाचणार आहेत. तसेच वाचणाऱ्या पैशातून अतिरिक्त लसींचे डोसही खरेदी करता येणे शक्य होणार आहे.

About Editor

Check Also

Hemoglobin Report

Hemoglobin Report : तुमचा हिमोग्लोबिन अहवाल असा समजून घ्या ! हा केवळ एक आकडा नाही, तर आरोग्याचा एक महत्त्वाचा निर्देशक आहे.

Hemoglobin Report  हिमोग्लोबिन (Hb) अहवालात नोंदवलेला आकडा लहान वाटू शकतो, परंतु तो आपल्या आरोग्याबद्दल महत्त्वाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *