खुशखबर ! कोरोनाग्रस्तांसाठी राज्य सरकार अमेरिकन ‘रेमडेसीवीर’ औषध खरेदी करणार इंजेक्शनच्या १० हजार व्हॉयल्स खरेदी करणार असल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी
कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचारासाठी राज्य शासनाने ‘रेमडेसीवीर’ इंजेक्शनच्या १० हजार व्हॉयल्स घेण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.
‘रेमडेसीवीर’ हे इंजेक्शन अँण्टी व्हायरल आहे. ‘सार्स’ आजारासाठी वापरण्यात आलेले हे इंजेक्शन त्यावर उपयुक्त ठरल्याने कोरोनावरही ते उपयुक्त ठरू शकते असे जागतिक आरोग्य संघटनेने सुचविले आहे. कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर या इंजेक्शनचा उपयोग चांगला होऊ शकेल, त्यामुळे राज्य शासनाने १० हजार इंजेक्शन व्हायल्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. कॉर्पोरेट कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) या इंजेक्शनची खरेदी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आतापर्यंत काही रुग्णांकडून हे इंजेक्शन वैयक्तीकरित्या खरेदी करून त्याचा वापर झाला आहे. मात्र सर्वसामान्य रुग्णांना ते घेणे परवडणारे नसल्याने शासनाने त्यांच्यासाठी हे इंजेक्शन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. हे इंजेक्शन उपलब्ध झाल्यावर त्याच्या वापराबाबत प्रमाणीत पद्धत (एसओपी) तयार केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

प्रकाश आबिटकर यांचे निर्देश, औषध गुणवत्ता तपासणीसाठी उपकरणांचा प्रभावी वापर करा औषधांच्या गुणवत्तेशी तडजोड नको

राज्यातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण औषधे उपलब्ध करून देताना औषधांच्या गुणवत्तेशी कोणत्याही प्रकारची तडजोड करू नये. सार्वजनिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *