नायर रुग्णालयातील लैंगिक प्रकरणाची मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून गंभीर दखल अधिष्ठाता बदलीचे व विशेष चौकशी समिती नेमण्याचे निर्देश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले असून पीडितांना न्याय मिळवून देण्याची खात्री दिली आहे.

अधिष्ठातांच्या बदलीचे तसेच विशेष चौकशी समिती नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना दिले. रुग्णालयातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त उपाययोजना राबवण्यात याव्यात, अशा सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या. या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आरोग्य क्षेत्रातील अशा घटना अत्यंत गंभीर आहेत. या प्रकरणाचा तपास करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. रुग्णालयातील सर्वांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे हे शासनाचे कर्तव्य आहे.

About Editor

Check Also

इयत्ता १० व १२ वी च्या परीक्षांचे प्रवेशपत्र उपलब्ध जुलै महिन्यात होणाऱ्या परिक्षेसाठी प्रवेश पत्र तयार

इयत्ता १० व इयत्ता १२ वी च्या जुन – जुलै २०२६ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने ८ जून २०२६ पासून उपलब्ध करून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *