राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी इच्छुक शिक्षकांनी ऑनलाइन स्व-नामांकन सादर करण्याचे आवाहन १० जुलै पर्यंत स्व-नामांकन अर्ज सादर करता येणार

केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार- २०२६ साठी ऑनलाइन स्व-नामांकन प्रक्रियेस प्रारंभ झाला असून राज्यातील पात्र शिक्षकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे.

शिक्षण संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी स्व-नामांकन प्रक्रिया दि. १५ जून २०२६ पासून सुरू झाली आहे. राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच मान्यताप्राप्त अनुदानित खाजगी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांना या पुरस्कारासाठी अर्ज करता येणार आहे.

पात्र शिक्षकांनी https://nationalawardstoteachers.education.gov.in या वेबपोर्टलवर दि. १० जुलै २०२६ पर्यंत स्व-नामांकन नोंदवावे. तसेच अर्जदारांनी आपले स्व-नामांकन अंतिम करून दि. १३ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाइन सादर करणे आवश्यक आहे.

राज्यातील अधिकाधिक पात्र शिक्षकांनी राष्ट्रीय स्तरावरील या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी अर्ज करून आपल्या शैक्षणिक कार्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्याची संधी साधावी, असे आवाहन शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ. महेश पालकर यांनी केले आहे.

About Editor

Check Also

मुंबईत साध्या वेषातील पोलिसाकडून आंदोलक महिलेशी गैरवर्तनः पोलिसांकडून मात्र सारवासारव पुरुष आंदोलकाला रोखण्याच्या नादात म्हणे महिला मध्ये आली

मुंबई पोलिसांनी शुक्रवारी व्हायरल व्हिडिओमध्ये दिसलेला एक साध्या वेषातील पोलीसाने आंदोलनादरम्यान एका महिलेला अत्यंत चुकीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *