माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात संचालक पदी हेमराज बागुल रुजू

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील संचालक (प्रशासन) या पदाचा कार्यभार हेमराज बागूल यांनी आज मंत्रालयात स्वीकारला. विभागाच्या सचिव तथा महासंचालक जयश्री भोज यांच्या उपस्थितीत संचालक (वृत्त व जनसंपर्क) गणेश रामदासी यांच्याकडून बागुल यांनी पदभार स्वीकारला.

याप्रसंगी उपसंचालक (वृत्त) दयानंद कांबळे, उपसंचालक (प्रशासन) गोविंद अहंकारी, उपसंचालक (प्रकाशने) अनिल आलुरकर, उपसंचालक (प्रदर्शने) सीमा रनाळकर आदींनी पुष्पगुच्छ देवून बागुल यांचे स्वागत केले.

महासंचालनालयाच्या नागपूर-अमरावती विभाग आणि औरंगाबाद-लातूर विभागाच्या संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभारही बागुल यांच्याकडे देण्यात आला आहे. बागुल यांनी यापूर्वी मुख्यमंत्र्यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी तसेच महासंचालनालयात प्रकाशने, महान्यूज, वृत्त आदी शाखांमध्ये त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. शासकीय सेवेत येण्यापूर्वी बागुल यांनी पत्रकारितेत योगदान दिले आहे. तसेच साहित्यविषयक विविध पुरस्कारांनी बागुल यांना सन्मानित करण्यात आले आहे.

About Editor

Check Also

विनयभंग करणाऱ्यास जाब विचारल्याने २० वर्षिय तरूणीला रेल्वे रुळावर ढकलले रुळावर ढकलल्याने चालत्या गाडीखाली हात आल्याने हात निकामी झाला

४ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील नायगाव रेल्वे स्थानकावर, एका लोकल ट्रेनमधील प्रवासादरम्यान एका व्यक्तीने छेडछाड करून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *