एस.ए.तागडे सामाजिक न्यायचे प्रधान सचिव तर डॉ. देशमुख पुणे जिल्हाधिकारी अन्य ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या प्रधान सचिव पदी एस.ए.तागडे यांची नियुक्ती करण्यात आली. तर हाफकिन औषध निर्माण महामंडळाचे व्यवस्थापकिस संचालक डॉ.राजेश देशमुख यांची पुण्याच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती राज्य सरकारकडून करण्यात आली.

सनदी अधिकारी पराग जैन यांची नियुक्ती सचिव वस्त्रोद्योग मंत्रालय मुंबई या पदावर, सुनील चव्हाण यांची नियुक्ती जिल्हाधिकारी औरंगाबाद या रिक्त पदावर करण्यात आली. याशिवाय डॉ. राजेश देशमुख यांच्या ठिकाणी डॉ. कुणाल खेमनार यांची नियुक्ती हाफकिन औषध निर्माण महामंडळावर व्यवस्थापकिय संचालक पदी नियुक्ती करण्यात आली असून संदीप कदम यांची नियुक्ती भंडारा जिल्हाधिकारी पदी करण्यात आली.

About Editor

Check Also

ठाणेकरांनी पुढील ७ दिवस पाणी उकळून व गाळून प्यावे येवई महासंतुलक जलाशयाच्या दुरुस्तीनंतर जलगुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता

बृहन्मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे-पांजरापूर येथील जलप्रणालीअंतर्गत येवई येथील महासंतुलक जलाशयाच्या कप्पा क्रमांक २ च्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *