RTO चे आदेश, बाईक टॅक्सीने प्रवास करू नका सुरक्षेच्या कारणास्तव जारी केले आदेश

प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून बाईक टॅक्सी व अवैधरित्या प्रवासी वाहतूक देणाऱ्या दुचाकी वाहनांमधून नागरिकांनी प्रवास करू नये,असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी,मुंबई (पश्चिम) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
राज्यातील रिक्षा संघटना, नागरीक तसेच विविध माध्यमांतून “बाईक टॅक्सी” संदर्भात तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्यामुळे राज्यात खाजगी दुचाकीचा बेकायदेशीर वापर काही संस्था अॅप आधारीत प्रणालीमधून करीत असल्याचे निदर्शनास आले आहे व त्याठिकाणी संबंधीत प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कारवाई केलेली आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाने अथवा राज्य परिवहन प्राधिकरणाने “बाईक टॅक्सी” अशा प्रकारचा कोणताही परवाना कोणालाही अद्याप जारी केलेला नाही. नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, प्रवाशांची फसवणूक होऊ नये व तसेच त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून बाईक टॅक्सी व अवैधरित्या प्रवासी वाहतूक देणाऱ्या दुचाकी वाहनांमधून नागरिकांनी प्रवास करू नये. तसेच अशा अॅपचा वापर करू नये. अशा वाहनांचा वापर मोटार वाहन कायद्याप्रमाणे बेकायदेशीर असून अशा वाहनांविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,मुंबई (पश्चिम) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, मुंबईचे सिंगापूर करण्याची वल्गणा करणाऱ्यांनी शहराची कचराकुंडी बनवली मुंबई उच्च न्यायालयाने बीएमसीवर ओढलेले ताशेरे अत्यंत गंभीर, जबाबदारी निश्चित करून अधिकाऱ्यांवर कारवाई करा

मुंबईत पायाभूत सुविधांची पुरती वाट लागली असून शहर पूर्णपणे बकाल केले आहे, हे काँग्रेस पक्ष …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *