मुंबईतील या रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा ठराव विधिमंडळात मंजूर विधानसभा आणि विधान परिषदेत मंत्री दादाजी भुसे यांनी मांडला ठराव

विधानसभा निवडणूकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी मतदारांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारकडून विविध योजना जाहिर करण्याची घाई करण्यात येत आहे. विधिमंडळाच्या सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी लाडकी बहीण योजना जाहिर करण्यात आली. त्याच धर्तीवर आता मराठी भाषेच्या मुद्यांवरून पुन्हा एकदा मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारने मुंबईतील रेल्वे स्थानकांना इंग्रज काळातील नावे काढून मराठी नावे देण्याचे नवे कार्ड आज वापरत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा ठराव विधानसभा आणि विधान परिषदेत मांडला. त्यास विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने पारीत करण्यात आला.

दादाजी भुसे यांनी मांडलेल्या ठरावानुसार मध्य रेल्वे मार्गावरील करी रोड रेल्वे स्थानकाचे नाव बदलून लालबाग रेल्वे स्थानक, सँडहॅर्स्ट रोड रेल्वे स्थानकाचे नाव बदलून डोंगरी रेल्वे स्थानक, पश्चिम मार्गावरील मरीन लाईन्स रेल्वे स्थानकाचे नाव बदलून मुंबा देवी रेल्वे स्थानक, चर्नी रोड रेल्वे स्थानकाचे नाव बदलून गिरगाव रेल्वे स्थानक, हार्बर रेल्वे मार्गावरील कॉटन ग्रीन चे काळा चौकी रेल्वे स्थानक, डॉक यार्ड रेल्वे स्थानकाचे नाव बदलून माझगाव रेल्वे स्थानक, किंग्ज सर्कल स्थानकाचे नाव तिर्थंकर पार्श्वनाथ रेल्वे स्थानक आदीप्रमाणे बदलण्यात यावेत, अशी शिफारस महाराष्ट्र विधान परिषद आणि विधानसभेकडून केंद्र शासनास करीत आहे, असा ठराव संमत करण्यात आला.

या ठरावाला सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील महाविकास आघाडील सदस्यांनी एकमतांने मंजूरी दिली.

About Editor

Check Also

धनंजय शिंदे यांची मागणी, एमएमआरडीए अभियांत्रिकी भरती परीक्षेतील घोटाळ्याची न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करा परिक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्याचे पालक नगरविकास विभागात कार्यरत

भाजपा सरकारच्या काळात परिक्षांना पेपरफुटीचे ग्रहण लागले असून सरकार एकही परीक्षा व्यवस्थित घेऊ शकत नाही. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *