अहमदाबादला गोमांस वाहतूक केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाकडून जामीन नाहीच व्यावसायिकाला अटकपूर्व जामीन नाहीच

महाराष्ट्रासह गुजरातमध्ये बंदी असलेल्या गोमांसाची वाहतूक केल्याचा आरोप असलेल्या मुंबईतील एका ६४ वर्षीय व्यावसायिकाला अटकपूर्व जामीन देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. अर्जदाराकडून सुमारे १,०६५ किलो गोमांस हस्तगत करण्यात आले आहे. खटल्यातील तथ्ये जाणून घेतल्यानंतर अर्जदाराविरुद्ध पुरेसे पुरावे आहेत आणि वस्तुस्थितीतील सर्व पैलूंचा विचार करता अतिरित माहिती समोर येण्यासाठी अर्जदाराची कोठडीत चौकशी आवश्यक असल्याचे निरीक्षण न्या. आर. एन. लड्ढा यांच्या एकपीठाने नोंदवले. अर्जदाराला अटकपूर्व जामीन मंजूर केल्यास तपासावर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत, अर्जदाराला अटकपूर्व जामीन देता येणार नसल्याचेही न्यायालयाने अर्ज फेटाळताना नमूद केले.

तत्पूर्वी, अर्जदाराला गुन्ह्यात खोट्या गुन्ह्यात गुंतवण्यात आले आहे. त्याच्याविरोधातील सर्व आरोप हे अर्थहीन असून आरोपांत कोणताही आधार नसल्याचा दावा यामीन कुरेशीच्या वतीने अँड. रोहित वैश्य यांनी केला. तसेच वाहन आणि गोमांस यापूर्वीच जप्त करण्यात आले असल्याने, अर्जदाराच्या कोठडीत चौकशीची आवश्यकता नसल्याचा दावाही त्यांनी केला. अर्जदाराचा गुन्ह्यात समावेश असल्याचे पुरेसे पुरावे पोलिसांकडे आहेत. तसेच तपास सुरुवातीच्या टप्प्यावर आहे आणि अटकपूर्व जामीन मंजूर केल्याने तपासात अडथळा येईल. याआधीही अर्जदाराविरोधात अशाचप्रकारचे तीन समान गुन्हे दाखल असल्याचेही अतिरिक्त सरकारी वकील योगेश दाबके यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यांची बाजू ग्राह्य धरून न्यायालयाने अर्जदाराचा अर्ज फेटाळून लावला.

काय आहे प्रकरण

फिर्यादीनुसार, २९ जुलै २०२४ रोजी पहाटे ४.३० च्या सुमारास संगमनेर ते अहमदाबाद मुंबई महामार्गाने गोमांस वाहतूक करणारा एक टेम्पो असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्या आधारावर सापळा रचून पोलीस अहमदाबाद महामार्गावरील अजित पॅलेस हॉटेलजवळ थांबले आणि संध्याकाळी ५.५० वाजता टेम्पो पाहिला. वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला या टेंम्पोसोबत असलेल्या स्कोडा गाडीने घटनास्थळावरून पळ काढला. माहिती देणाऱ्याने पोलिसांशी संपर्क साधला आणि काशिमीरा पोलिस ठाण्याचे अधिकाऱ्यांनी वाहन आणि त्यातील दोन प्रवाशांना ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यामध्ये, एक पशुवैद्यकीय वैद्यकीय अधिकारी आणि साक्षीदारांना बोलावण्यात आले आणि त्यांनी वाहनातून गोमांसाचे नमुने गोळा केले. त्यानंतर वाहन एका वजनकाट्यावर नेण्यात आले, तेथे सुमारे १,०६५ किलो गोमांस आढळून आले. पोलिसांनी वाहन, गोमांस आणि भुसाच्या जप्त केला. पोलिसांनी पकडलेल्या आरोपींकडे चौकशी केली असता संगमनेर येथील अकीन हारुण कुरेशी व फरहान गफार कुरेशी या दोघांनी यामीन कुरेशी यांना गोमांस वाहतूक व वितरणासाठी दिल्याचे उघड झाले.

About Editor

Check Also

बदलापूर शाळेतील अल्पवयीन मुलींचे दहावीपर्यंत प्रवेश शुल्क शासनामार्फत भरण्यास विशेष मान्यता शासन निर्णय जारी करत दिली मान्यता

बदलापूर येथे ऑगस्ट २०२४ मध्ये एका शाळेत अनुचित घटना घडली होती. त्या घटनेनंतर त्यातील दोन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *