महाराष्ट्र केडरच्या २३ अधिकाऱ्यांची आयएएस पदासाठी निवड राज्य सरकारने पाठविलेल्या यादीवर केंद्र सरकारचा निर्णय

काही दिवसांपूर्वी मॅटने दिलेल्या निर्णयामुळे राज्य सरकार केडरमधील कोणत्या अधिकाऱ्यांना मानले जायचे यावरून प्रश्न निर्माण झाले होते. त्यातच मागील काही वर्षात सर्वाधिक आयएएस अधिकारी म्हणून पदोन्नती मिळण्याची संधी महसूल आणि सहकार विभागातील अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यामुळे राज्य सरकार केडरमधील नेमके अधिकारी कोण असा सवाल उपस्थित केला जात होता. मात्र नुकतेच राज्य सरकारच्या प्रशासनाने पाठविलेल्या २३ जणांच्या यादीतील अधिकाऱ्याना आयएएस अधिकारी पदासाठी निवड करण्यात आली असून या अधिकाऱ्यांना १ वर्षाचा प्रोबेशनरी कालावधी पूर्ण करावा लागणार आहे.

महाराष्ट्र सरकारने केंद्रीय लोकसेवा आयोगाला आणि कार्मिक मंत्रालयाला पाठविलेल्या यादीतील २३ जणांची नावे आयएएस अधिकारी पदासाठी निवडली गेली आहेत.

आयएएस अधिकारी पदासाठी निवड झालेल्या अधिकाऱ्यांची नावे खालील प्रमाणे..

१) संजय ज्ञानदेव पवार, २) नंदकुमार चैत्यराम बेडसे, ३) सुनील बालाजीराव महिंद्रकर ४)रविंद्र जीवाजीराव खेबूडकर, ५) निलेश गोरख सागर, ६) लक्ष्मण भिका राऊत, ७) बाबासाहेब जालिंदर बेलदार, ८) जगदीप गोपीकिशन मिनियार, ९) माधवी समीर सरदेशमुख, १०) डॉ ज्योस्तना गुरूराज पडीयार, ११) अन्नासाहेब दादू चव्हाण, १२) गोपीचंद मुरलीधर कदम, १३) बापू गोपीनाथराव पवार, १४) महेश विश्वास गायकवाड, १५) वैदही मनोज रानडे, १६) विवेक बन्सी गायकवाड, १७) नंदीनी मिलिंद आवडे, १८) वर्षा मुकुंद लड्डा, १९) मंगेश हिरामण जोशी, २०) अनिता निखिल मेश्राम, २१) गीतांजली श्रीराम बाविस्कर, २२) दिलीप ज्ञानदेव जगदाळे, २३) अर्जून किसनराव चिखले या २३ अधिकाऱ्यांची निवड आयएएस पदासाठी झाली आहे. या सर्वांना एक वर्षाचा प्रोबेशनरी कालावधी मिळणार असून वयाच्या ६२ वर्षापर्यंत आयएएस अधिकारी म्हणून काम पाहता येणार आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने जारी केलेली ऑर्डर खालील प्रमाणेः

About Editor

Check Also

भिवंडी येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीची आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून पाहणी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखाची मदत

भिवंडी येथे घडलेल्या दुर्दैवी इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *