तिरुपतीतील अपघातात मृत पावलेल्या सोलापूरच्या युवकांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

तिरुपती येथे दर्शनासाठी गेलेल्या सोलापूर येथील भाविकांच्या वाहनाला बुधवारी अपघात झाला. त्यात सोलापूर येथील पाच तरुणांचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले. या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त करतानाच मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत. या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

तिरूपती येथे दर्शनासाठी सोलापूर येथून गेलेल्या तरुणांच्या वाहनाला काल तिरूपतीजवळ अपघात झाला. त्याच पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर तिरूपती देवस्थानच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी जखमींच्या उपचाराबाबत सोलापूर प्रशासनाला निर्देश दिले. मृतांच्या कुटुंबियांना तातडीने प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

About Editor

Check Also

दत्तात्रय भरणे यांची माहिती, पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्र आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमई) अंतर्गत उत्कृष्ट कामासाठी  महाराष्ट्राला राष्ट्रीय स्तरावर आज प्रदान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *