विमान अपघातानंतर संजय राऊत यांचा सवाल, …मग काय टाळता येतं कोणत्या प्रकारचं राज्य देशावर लादलय

कालच्या अपघातावर कोणी राजकारण करू नये. मृत पावलेले भारतीय असतील किंवा परदेशी नागरिक असतील. ते आपल्या भारतातून एअर इंडियाने प्रवास करत होते, यात भारतीय हवाई क्षेत्राची प्रतिष्ठा पणाला लागली. एअर इंडियाचं खासगीकरण सरकारने केलं आणि टाटाला दिलंय. टाटाने प्रत्येकी एक कोटी दिले म्हणून प्रश्न संपत नाही. इतका मोठा तांत्रिक बिघाड, विमान लंडनला चाललंय, दोन्ही इंजिन बंद पडतात, मी त्यातला एक्सपर्ट नाही, दोन्ही इंजिन बंद पडतात.  काही असो. चौकशी होईल पण एवढा मोठा अपघात होतो. हा अपघात आहे, अपघात टाळता येत नाही, असं अमित शाह म्हणतात तेव्हा या देशावर कोणत्या प्रकारचं राज्य लादलेलं आहे हे दिसतं. रेल्वेचा अपघात टाळता येत नाही, पहलगामचा हल्ला टाळता येत नाही, अहमदाबाद सारखा भयंकर विमान अपघात टाळता येत नाही. मग यांना टाळता काय येतं? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, या विषयाचं राजकारण करायचं नाही. ड्रीमलायनर जेव्हा विकत घेतली तेव्हा त्याच्या खरेदी बाबत, तांत्रिक मुद्द्याबाबत प्रश्न उपस्थित करणारे भाजपाचेच लोकं होते. आपण संसदेतील रेकॉर्ड पाहू शकता. प्रफुल्ल पटेल सिव्हिल एव्हिएशन मंत्री होते आणि त्यांना प्रश्न विचारणारे भाजपाचे लोकं होते, एवढंच माझ्या स्मरणात असल्याचे सांगितले.

अहमदाबाद वरून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला काल उड्डाण होताच काही क्षणात अपघात झाला. विमान नागरी वसाहती इमारतीला धडकून जमिनीवर कोसळले. यामध्ये विमानातील एक वगळता प्रवासी आणि विमानातील कर्मचारी (क्रू) असे २६५ जण मृत्यूमुखी पडले. या अपघातामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली असून ठाकरे शिवसेनेच्या वतीने दुख व्यक्त करीत श्रद्धांजली वाहली.

खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणात सरकारला धारेवर धरताना म्हणाले की, या अपघातात २४१ प्रवासी मृत्यू पावतात, विमान मेडिकल हॉस्टेलवर कोसळले, त्यातील २४ डॉक्टर आणि मेडिकलचे अनेक विद्यार्थी मृत्यू पावतात. राखरांगोळी होते. मात्र इतकं होऊनही या अपघाताची जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाही. सरकारच्या चेहऱ्यावर दुखाची वेदना, पश्चात्ताप दिसत नाही, अशा शब्दांत टीका केंद्र सरकारवर टीका केली.

संजय राऊत शेवटी बोलताना म्हणाले की, एअर इंडियाचं विमान कोसळणं ही या देशातील हवाई वाहतूक करणाऱ्या प्रवाशांसाठी चिंताजनक आणि अस्वस्थ करणारी घटना आहे. अत्यंत सुरक्षित समजलं जाणारं ड्रीमलाइनर हे टेक ऑफ नंतर एका मिनिटाच्या आत कोसळतं २४१ प्रवासी त्यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी राज्यसभेतील माझे सहकारी होते. त्यांचंही निधन झालं. इतकं होऊनही या अपघाताची जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाही. रेल्वेचे अपघात होत आहेत, पहलगाम सारख्या दहशतवादी हल्ल्यात लोक बळी जात आहेत, विमानाचे अपघात होत आहे. पण सरकारच्या चेहऱ्यावर दुखाची रेषा, वेदना, पश्चात्ताप दिसत नाही. भाजपानेच त्या काळात या ड्रिमलायनरवर आक्षेप घेतला होता. गैरव्यवहार खरेदीत झाला का? दबावाखाली ही खरेदी झाली का असे सवाल भाजपाने तेव्हा केले होते. ३०० पेक्षा जास्त लोकांचे प्राण त्यात गेले. म्हणून आम्हाला चिंता वाटते. त्यामुळे प्रश्न उपस्थित करावे लागतात. यात १० ते १२ महाराष्ट्रातील लोक आहेत. जबाबदारी कोण घेणार आहे ? असा सवाल करत याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही यावेळी केली.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, नगरपालिका निवडणुकांमध्ये लोकशाहीचे वस्त्रहरण सालेकसामध्ये मतदान संपल्यावर १७ ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा मतदान पण गुन्हा दाखल नाही

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये बोगस मतदान, दडपशाही व सर्व नियम धाब्यावर बसवून मतदान झाले. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *