अजित पवार यांची माहिती, दारू दुकानांच्या स्थलांतरासाठी सोसायटीची एनओसी बंधनकारक विधानसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली माहिती

राज्यात एफ.एल–2 आणि सी.एल–3 परवानाधारक विदेशी व देशी दारू किरकोळ विक्री केंद्रांच्या स्थलांतरासाठी नोंदणीकृत सोसायटीची एनओसी अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री व उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली.
सदस्य शंकर जगताप यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

अजित पवार म्हणाले की, संबंधित दुकान सोसायटी परिसरात असेल तर सोसायटीची संमती नसल्यास स्थलांतरास कोणतीही परवानगी दिली जाणार नाही. एफएल–2 आणि सीएल–3 परवान्यांबाबत ही अट आता काटेकोरपणे लागू राहील. पिंपरी-चिंचवड येथील कोळीवाडा आणि रहाटणीतील दोन अनधिकृत दारू दुकाने निलंबित करण्यात आल्याचेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. यापैकी एक प्रकरण न्यायालयात प्रलंबित असून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई केली जाईल, तर एका दुकानावर यापूर्वी रुपये ५०,००० दंड आकारण्यात आल्याचे  स्पष्ट केले.

About Editor

Check Also

दत्तात्रय भरणे यांची माहिती, पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्र आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमई) अंतर्गत उत्कृष्ट कामासाठी  महाराष्ट्राला राष्ट्रीय स्तरावर आज प्रदान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *