अनिल देशमुख यांची टीका, परमबीर सिंगाच्या “पापाचा घडा” भरला लीलावती रूग्णालय़ाने अपमानास्पदरित्या बदतर्फ केल्याने त्यांचे चारित्र्य जनतेसमोर

ज्या परमबीर सिंग याने मी गृहमंत्री असतांना माझ्यावर खोटे आरोप करून मला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले होते, त्याच पममबीर सिंगाचे भ्रष्टाचारी कारनामे आता एकामागून एक समोर येत आहेत. मुंबईतील प्रख्यात लीलावती रुग्णालयाने त्याला ज्या पद्धतीने अपमानास्पद रित्या बडतर्फ केले आहे, त्यावरून त्यांचे चारित्र्य आता महाराष्ट्राच्या जनतेसमोर उघडे पडले आहे. त्याच्या पापाचा घडा आता भरला आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले आहे.

सुप्रसिद्ध लीलावती रुग्णालयातील ट्रस्टी व डॉक्टरांनी परमबीर सिंग याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, परमबीर सिंग याने रुग्णालयातील अनेक डॉक्टरांकडून बढतीसाठी प्रत्येकी २५ लाख रुपयांची लाच वसूल करण्याचा उद्योग सुरू केला होता. या घोटाळ्यांमुळे आणि गैरवर्तनामुळे रुग्णालय प्रशासनाने त्याला पदावरून काढून टाकले आहे.

अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले की, मी गृहमंत्री असताना माननीय मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानाबाहेर बॉम्ब आढळल्यानंतर तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग या प्रकरणात सरकारची दिशाभूल करत होता. त्याच्या तपासावर संशय आल्याने आम्ही हा तपास त्याच्या हातातुन काढून तो दहशतवाद विरेधी पथक यांच्याकडे सोपवला. एटीएसच्या तपासात परमबीर सिंग हाच या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचे गंभीर संकेत मिळाले होते. म्हणूनच आम्ही त्याची कमी महत्त्वाच्या पदावर लगेच बदली करून पुढे त्याला सरकारी नोकरीतून बडतर्फ करण्यात आले.

अनिल देशमुख पुढे म्हणाले की, बडतर्फीची कारवाई टाळण्यासाठी परमबीर सिंग याने माझ्यावर १०० कोटींचे खोटे आरोप केले. आरोप झाल्याबरोबर मी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. यानंतर हायकोर्टाचे न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली. न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या कोर्टासमोर जेव्हा त्याला हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले, तेव्हा तो हजर झाला नाही. तब्बल सहा वेळा समन्स काढूनही तो गैरहजर राहिला. शेवटी अटकेच्या भीतीने तो फरार झाला होता. शेवटी त्याने वकिलामार्फत प्रतिज्ञापत्र सादर करून मान्य केले की, ‘माझ्याकडे अनिल देशमुखांविरुद्ध कोणताही पुरावा नाही.

शेवटी बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, अशा भ्रष्ट आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अधिकाऱ्याचे लीलावती रुग्णालयातील कारनामे पाहता. या लीलावती रुग्णालयातील संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याची मागणीही यावेळी केली.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, तिसऱ्या मुंबईच्या विकासाला आंतरराष्ट्रीय भागीदारीमुळे गती मिळणार रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये १०० एकरांचा जागतिक दर्जाचा मिश्र-वापर विकास प्रकल्प, मॅपलट्रीकडून १.१ अब्ज डॉलरपेक्षा अधिक FDI अपेक्षित; सुरबाना ज्युराँगची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती

मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) आणि त्यापलीकडील परिसर हा देशाच्या आर्थिक विकासाचे प्रमुख केंद्र बनण्याची क्षमता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *