भाजपाचे केंद्रीय महामंत्री विनोद तावडे यांची काँग्रेस नेत्यांना नोटीस माफी मागा नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरे जा

नाला सोपारा येथील विवांता हॉटेलमध्ये विरारचे बहुजन विकास आघाडीचे प्रमुख तथा आमदार हितेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकूर यांनी धाड टाकत भाजपाचे नेते विनोद तावडे यांना पैशाच्या बॅगेसह पकडले. तसेच त्यांच्यावर असलेल्या बागेत पैशांची पाकिटे आणि दोन डायऱ्याही सापडल्या. त्यावरून राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली.

या घटनेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून यांनीही भाजपाचे नेते विनोद तावडे हे पाच कोटीच्या रकमेसह सापडल्याचा आरोप करत पैशाची बॅग आणि पैसे दिसत असल्याचा व्हायरल व्हिडीओही काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक्सवर ट्विट केला. या सगळ्या गोंधळात पोलिसही घटनास्थळी पोहोचले, तसेच निवडणूक अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. मात्र यासंदर्भात विनोद तावडे यांच्या विरोधात कोणतीही कारवाई किंवा गुन्हा नोंदविण्यात आला नाही.

परंतु यासंदर्भात विनोद तावडे यांनी हितेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याऐवजी पॉलिटीकल स्टंटबाजी करत काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना कायदेशीर नोटीस पाठविण्यात आल्याचे सांगत या नोटीसा राहुल गांधी आणि मल्लिकार्जून खर्गे यांना मिळाल्या असल्याचे सांगितले.

तसेच पुढे बोलताना विनोद तावडे म्हणाले की, राहुल गांधी आणि मल्लिकार्जून खर्गे यांनी माझी आणि पक्षाची जाहिर माफी मागावी अशी मागणी करत नाहीतर होणाऱ्या कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यास तयार रहावे असा इशारा दिला.

विनोद तावडे पुढे प्रसारमाध्यमाशी बोलताना म्हणाले की, काँग्रेस नेत्यांनी माझ्याविरोधात खोटे आरोप केले. माझ्या सारख्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या कार्यकर्त्याकडून पाच कोटीची रक्कम कशी काय वाटली जाऊ शकते असा सवाल करत माझी आणि भाजपाची बदनामी राहुल गांधी आणि मल्लिकार्जून खर्गे यांनी केली आहे. त्यामुळे त्यांनी माझी आणि माझ्या पक्षाची माफी मागावी अशी मागणी केली.

About Editor

Check Also

अंबाझरी पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी राज्य शासन मनपाला सहकार्य करणार अंबाझरी तलावाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पाहणी

नागपूरचे वैभव म्हणून अंबाझरी तलावाकडे पाहिले जाते. पाण्याची व्यवस्था नव्हती तेव्हा नागनदीवरील धरण किंवा साठवण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *