‘सारथी’ च्या कार्यालयासह २२५ कोटींच्या विविध इमारतींचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन ५०० मुले ५०० मुलींची क्षमता असलेले वसतिगृह

नाशिक येथे छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थात सारथी च्या १५६ कोटींच्या विभागीय कार्यालयासह विविध इमारती बांधण्यात येणार आहेत. या विभागीय कार्यालयासह अभ्यासिका, ५०० मुलांची व ५०० मुलींची वसतिगृह इमारत तसेच ४३ कोटी रूपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या धनगर समाजातील १०० विद्यार्थी व १०० विद्यार्थीनींसाठीचे वसतिगृह व कार्यालय इमारत आणि २५ कोटी रूपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या वनभवन इमारतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते कोनशिला अनावरण करून भूमिपूजन झाले.

भूमिपूजन समारंभ कार्यक्रमास आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, ॲड. राहुल ढिकले, माजी मंत्री महादेव जानकर, माजी खासदार हेमंत गोडसे, सकल मराठा समाज व सकल धनगर समाजातील मान्यवर आदी उपस्थित होते.

यावेळी सकल मराठा समाज बांधव आणि सकल धनगर समाज बांधव यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सत्कार करण्यात आला. आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी केलेल्या विविध विकास कामांवर आधारित विकास पर्व या पुस्तिकेचे अनावरण उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, ई-बसेससाठी चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारा ‘विकसित महाराष्ट्र’ अंतर्गत एसटीचा १०० टक्के ताफा ई-बसेसमध्ये रूपांतरित करण्याचे उद्दिष्ट

‘विकसित महाराष्ट्र अंतर्गत’ पर्यंत एसटी महामंडळामध्ये सन २०२९ पर्यंत ५० टक्के, २०३५ पर्यंत ८० टक्के; तर २०४७ पर्यंत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *