काँग्रेसची मागणी, राज्यात १८सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलादची सुट्टी जाहीर करा नसीम खान यांची मुख्यमंत्र्यांना लेखी पत्राद्वारे मागणी

१७ सप्टेंबर रोजी राज्यातील गणेश विसर्जन आहे. त्या दिवशी राज्य सरकारकडून शासकिय सुट्टी जाहिर करण्यात आलेली आहे. तर १६ सप्टेंबर रोजी महमंद पैगंबर यांचा जन्म दिवस आहे. त्यामुळे १६ सप्टेंबर रोजीची महमंद पैगंबर यांच्या जयंती निमित्त जाहिर करण्यात आलेली सुट्टी १८ सप्टेंबर रोजी जाहिर करावी अशी मागणी माजी मंत्री व प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष मो. आरिफ (नसीम) खान यांनी राज्याचे मुख्यमंत्री व दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांना लेखी पत्राद्वारे केली. तसेच १६ सप्टेंबर रोजीच्या मुस्लिम काढण्यात येणाऱ्या मिरवणूका या १८ सप्टेंबर रोजी काढण्यात येतील. त्यामुळे १६ सप्टेंबर रोजीची सुट्टी १८ सप्टेंबर रोजी जाहिर करावी अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली.

नसीम खान यांनी त्यांच्या पत्रात लिहीले की, संपूर्ण विश्वाला शांतीचा भाईचाराचा संदेश देणारे मोहम्मद पैगंबर साहेबांचा (S.A.W) जन्मदिवस १६ सप्टेंबर रोजी असून १७ सप्टेंबर रोजी हिंदू बांधवांचा गणेश विसर्जन म्हणजे अनंत चतुर्थी दिवस आहे. कॅलेंडरवर सुद्धा १६ सप्टेंबर सुट्टी म्हणून घोषित करण्यात आलेली आहे.

दोन्हीही धर्माचे पवित्र अशा सणाचे पावित्र्य राखण्याच्या अनुषंगाने ०७ सप्टेंबर रोजी ऑल इंडिया खिलाफत कमिटी मध्ये मुंबई सहित महाराष्ट्रातील औरंगाबाद, जालना, मालेगाव, भिवंडी, ठाणे व इतर विविध मुस्लिम संघटनाची बैठक घेण्यात आली होती आणि त्या बैठकीत राज्यात बंधुभाव व हिंदू-मुस्लिम एकोपा अबाधित राखण्याकरिता हिंदू बांधवांचा अनंत चतुर्थी (गणेश विसर्जन) आणि मुस्लिम बांधवांच्या मोहम्मद पैगंबर साहेबांच्या (S.A.W) जन्मदिवशी काढण्यात येणारी मिरवणूक १६ सप्टेंबर ऐवजी १८ सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय घेण्यात आला. जेणेकरून दोन्हीही धर्माचे सण प्रेम व सद्भावणाने साजरा करता येतील. या सर्व बाबी लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी १६ सप्टेंबर एवजी १८ सप्टेंबर रोजी राज्यात सुट्टी घोषित करावी अशी मागणी नसीम खान यांनी आपल्या पत्राद्वारे केली.

About Editor

Check Also

सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून आपले वेद वदवतायंत- राज ठाकरे

ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवले होते. आता सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून आपले वेद (?) वदवतायंत. असो, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *