‘लाडकी बहीण’ विरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची याचिका भाजपाची टीका काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा पुन्हा उघड झाल्याचा केशव उपाध्ये यांची टीका

लाडकी बहीण योजनेला महिला वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने विरोधकांकडून जाणूनबुजून योजनेच्या विरोधात मोहीम सुरू आहे. योजनेचे यश डोळ्यात खुपत असल्याने काँग्रेस नेते सुनील केदार यांचा कार्यकर्ता असलेल्या अनिल वडपल्लीवार याने लाडकी बहिण योजने विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

अनिल वडपल्लीवार यांच्या मार्फत काँग्रेस आणि महाविकास आघाडी, लाडकी बहिण योजनेविरोधातील त्यांचा अजेंडा राबवत आहे असा अशी टीका भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली. या याचिकेमुळे काँग्रेसने आपला महिला विरोधी चेहरा पुन्हा एकदा दाखवून दिला अशी टीकाही यावेळी केली.

केशव उपाध्ये यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले की, अनिल वडपल्लीवार यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत लाडकी बहीण योजना बंद करण्याची मागणी केली. काँग्रेसने यापूर्वीही लाडकी बहिण योजने विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने याचिका फेटाळून लावली होती. आता पुन्हा एकदा काँग्रेसचा बेगडीपणा उघड झाला आहे. महायुती सरकारच्या या योजनेचे महिलावर्गातून स्वागत होत आहे. या योजनेमुळे महिला वर्ग महायुतीच्या बाजूने झुकेल तसेच आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला फटका बसेल या भीतीने काँग्रेस या ना त्या प्रकारे योजनेमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका केली.

पुढे बोलताना केशव उपाध्ये म्हणाले की, राज्यातील माताभगीनी आणि मुलींच्या आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंबन, पोषण आणि सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सुरू केली. कोणत्याही परिस्थितीत ही योजना बंद पडणार नाही हे वारंवार महायुती सरकारकडून स्पष्ट करण्यात येत असूनही काँग्रेसकडून अपप्रचार केला जात आहे. विरोधाला विरोध करायचा या भूमिकेनुसार महिला हिताच्या या योजनेला आडकाठी करण्यात येत असून काँग्रेस आणि विरोधकांच्या भुलथापांना सूज्ञ जनता बळी पडणार नाही असे ठामपणे सांगितले.

About Editor

Check Also

अंबाझरी पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी राज्य शासन मनपाला सहकार्य करणार अंबाझरी तलावाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पाहणी

नागपूरचे वैभव म्हणून अंबाझरी तलावाकडे पाहिले जाते. पाण्याची व्यवस्था नव्हती तेव्हा नागनदीवरील धरण किंवा साठवण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *