लोकसभा तयारीसाठी १८ जानेवारीपासून काँग्रेसच्या विभागीय आढावा बैठका

लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस पक्ष सज्ज झाला असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यातील सर्व विभागात विभागनिहाय बैठकांचे आयोजन केले आहे. १८ जानेवारी रोजी अमरावती येथून या बैठकांना सुरुवात होत आहे.

नवनियुक्त प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली या बैठका होत असून विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य अशोकराव चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषद गटनेते सतेज बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष, काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य चंद्रकांत हंडोरे, आ. यशोमती ठाकूर, आ. प्रणिती शिंदे, प्रदेश कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान, बसवराज पाटील, आ. कुणाल पाटील, राज्यातील माजी मंत्री, जिल्हा अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत दोन सत्रात या बैठका होणार आहेत. विभागीय बैठक सकाळी १० ते दुपारी १ वाजेदरम्यान व दुपारी २.३० ते ५.३० या वेळेत होणार आहेत.

अमरावती विभागाची बैठक अमरावती येथे १८ जानेवारी रोजी, नागपूर विभागाची बैठक नागपूरात २० जानेवारी रोजी, पश्चिम महाराष्ट्राची बैठक पुणे येथे २३ जानेवारी रोजी, कोकण विभागाची बैठक भिवंडी येथे २४ जानेवारी रोजी, उत्तर महाराष्ट्र विभागाची बैठक धुळे येथे २७ जानेवारी रोजी तर मराठवाडा विभागाची बैठक लातूर येथे २९ जानेवारी रोजी होणार आहे.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून महाराष्ट्राची क्रूर थट्टा,राज्याच्या मदतीवर चकार शब्दही नाही महाराष्ट्रात अस्मानी व सुलतानी संकट, शेतकरी व शेतमजुरांना भरीव मदत द्या, पिण्याचे पाणी, चारा छावण्या तात्काळ सुरु करा

महाराष्ट्र सध्या भिषण दुष्काळाचा सामना करत आहे. पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे, शेतकरी व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *