निवेदनांवर मुख्यमंत्री शिंदे खोटी स्वाक्षरी

कार्यवाहीसाठी आलेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी तसेच शिक्के असल्याचे मुख्यमंत्री सचिवालयाला निदर्शनास आले असून यासंदर्भात मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वाक्षरीनिशी शेरे असलेली निवेदने व पत्र पुढील कार्यवाहीसाठी ठिकठिकाणाहून मुख्यमंत्री सचिवालयास प्राप्त होत असतात. या निवेदनांची टपाल शाखेत नोंद होऊन ती ई – ऑफिस प्रणालीत नोंद केली जाऊन संबंधित प्रशासकीय विभागांना पाठवण्यात येतात. नुकत्याच मुख्यमंत्री सचिवालयास प्राप्त झालेल्या दहा ते बारा निवेदनांवर मुख्यमंत्री शिंदे यांची स्वाक्षरी आणि शिक्के संशयास्पद व बनावट असल्याचे कर्मचाऱ्यांना निदर्शनास आले. त्यांनी ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली. मुख्यमंत्री शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले. यावरून मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

कार्यालयीन कर्मचाऱ्यांनीही अधिक सतर्कपणे काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.

 

About Editor

Check Also

राष्ट्रवादीच्या विलनीकरणाच्या प्रश्नी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना वगळण्याकडे अनेक नेत्यांचा कल राष्ट्रवादीच्या विलनीकरणामागे भाजपाच्या हालचाली, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली अमित शाह यांची भेट

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) राष्ट्रीय राजधानीत ‘इंडिया’ (INDIA) आघाडीच्या निदर्शनांमध्ये सहभागी झाल्यानंतर, भाजप एनडीए …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *