महाराष्ट्रात महायुतीला संशयातीत बहुमत मिळाल्यानंतर महायुतीकडून मुख्यमंत्री पदासाठी तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ राज्यपालांच्या वतीने राजशिष्टाचार विभागातील एका महिलेने शपथ दिली.
विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदासाठी तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे. तर माजी मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर अजित पवार यांनी ६ व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. महायुतीचा शपथविधी पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी तिन्ही मंत्र्यांचे पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले.
आज मुंबईतील आझाद मैदान येथे देशाचे पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत शपथ विधी सोहळा उत्साहात पार पडला.
यावेळी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. कायद्याद्वारे स्थापित झालेल्या भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा आणि निष्ठा बाळगेन.… pic.twitter.com/qGK3Hv0Bex
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 5, 2024
शपथविधी सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीच्या तिघांचे अभिनंदन केल्यानंतर या शपथविधी सोहळ्यासाठी खास उपस्थित राहिलेल्या भाजपाच्या केंद्रीय मंत्री आणि भाजपा शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेत त्यांच्याशी काही सेकंदासाठी संवाद साधत कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानले.
शपथविधी सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित जनतेचे, सेलिब्रिटी आणि उद्योजकांचे आभार मानले आणि त्यानंतर शपथविधीच्या सोहळ्याची सांगता राष्ट्रगीताने झाली.
#Live l 05-12-2024
📍आझाद मैदान, मुंबईमहायुती सरकारचा शपथविधी सोहळा – लाईव्ह
Swearing in Ceremony of Mahayuti Government of Maharashtra#Maharashtra #Mumbai #OathCeremony https://t.co/aq3BBxjfVk
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 5, 2024
विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर सर्वात शेवटी अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे शपथविधीचा क्रम पाहता माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्य मंत्रिमंडळात दुसऱ्या स्थानी असतील की तिसऱ्या स्थानी असतील याचा उलघडा लवकरच खातेवाटप जाहिर झाल्यानंतर होणार आहे.
Marathi e-Batmya