वंचितने केली मंगलदास बांदल यांची शिरुरची उमेदवारी रद्द

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शिरुर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती. तसेच, वंचित बहुजन आघाडीने बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांना आपला पाठिंबा देत तेथे उमेदवार न देण्याचे धोरण ठरवले होते.

बारामतीबाबत जो निर्णय वंचितने घेतला, त्या विरोधात मंगलदास बांदल गेल्याने वंचित बहुजन आघाडीने मंगलदास बांदल यांची शिरुर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या सूचनेनुसार रद्द करण्यात आली आहे.

वास्तविक पाहता काही दिवसांपूर्वी भाजपाचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बारामती येथे गेले होते. त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शिरूरचे उमेदवार मंगलदास बांदल हे ही तेथे गेले होते. मात्र तेथे देवेंद्र फडणवीस हे ज्या मित्राच्या घरी गेले होते, त्याच व्यक्तीच्या घरी मंगलदास बांदल हे ही होते. तसेच देवेंद्र फडणवीस आणि मंगलदास बांदल हे त्या घरातून काही सेंकदाच्या अंतराने एका मागोमाग एक असे बाहेर पडत असल्याचे अनेक वृत्त वाहिन्यांनी दाखविले. यावरून मंगलदास बांदल यांना देण्यात आलेली उमेदवारी वंचितने अखेर रद्द केल्याची चर्चा राजकिय वर्तुळात रंगली आहे.

 

About Editor

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची टीका, दिल्लीतील आरक्षणविरोधी आंदोलन उच्च जातींचे वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न काँग्रेस नेतृत्वाचे मौन तितकेच निंदनीय आणि यामध्ये सामील असल्याचा संकेत

दिल्लीतील ‘आरक्षणविरोधी’ आंदोलने तथाकथित उच्च जातींकडून आपले वर्चस्व टिकवण्याचा एक उघड प्रयत्न दर्शवत असल्याचे वंचित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *