मुंबईतील शेतकरी आंदोलनात शरद पवारांसह आघाडीचे नेते राहणार उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी
दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी २३, २४, २५ जानेवारी रोजी आझाद मैदान येथे होणाऱ्या शेतकरी आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारसाहेब हे २५ जानेवारी रोजी सहभागी होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
या शेतकरी आंदोलनाला राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने कृषी कायद्याला विरोध केला आहे. आता या आंदोलनात महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष आणि त्यांचे नेते व मुख्यमंत्रीही सहभागी होणार आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.

About Editor

Check Also

प्रताप सरनाईक यांचे मत, ‘एसटी’च्या आर्थिक सक्षमतेसाठी विनावाहक बससेवेला प्राधान्य द्या प्रवाशांना अधइक सुलभ आणि गतिमान सेवा उपलब्ध करून द्या

महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एसटी) आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी उत्पन्नवाढीवर भर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *