मोदींची नवी घोषणा,” वन नेशन, वन इलेक्शन”…व्हिडिओ पाह्यला विसरू नका संविधान दिनाचे औचित्य साधत पंतप्रधानांची घोषणा

मुंबईः प्रतिनिधी
देशात सतत कोणत्या ना कोणत्या भागात निवडणूका सुरु असतात. त्यामुळे सुरु असलेल्या विकास कामांमध्ये अडथळा निर्माण होतो. तसेच नागरिक म्हणून त्याचा त्रास ही होतो. त्यामुळे वन नेशन-वन इलेक्शन अर्थात एक देश एक निवडणूकी संकल्पना राबविण्याचा विचार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जाहीर केले.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संसदेने राज्यघटना स्विकृत केली. या दिनानिमित्त देशभरात संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. गुजरातमध्ये या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
संपूर्ण देशभरात ही संकल्पना राबविण्याच्या उद्देशाने निवडणूक अधिकारी म्हणून काम पहात असलेल्यांकडून चांगल्या सूचना येवू शकतात. त्यामुळे या पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सूचना कराव्यात असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
एक देश एक निवडणूका ही संकल्पना राबविल्यास देशात विकास कामांमध्ये अडथळा निर्माण होणार नाही. तसेच एकाचवेळी संसदेतील लोकप्रतिनिधीपासून ते गाव पातळीवरील सरपंचापर्यंत एकादाच होईल असेही त्यांनी सांगत या संकल्पनेवर जनतेमध्ये विचारमंथन होण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

 

About Editor

Check Also

खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी, मुंबईत ४० टक्केही मॅपिंग झालेले नाही, ते पूर्ण करा

लोकशाही व्यवस्थेत निवडणुका हा एक उत्सव आहे, या उत्सवात सर्वांचा सहभाग असला पाहिजे परंतु एसआयआर मोहिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *