सोलर डिफेंस अँड एरोस्पेस ही भारतातील अग्रगण्य उत्पादक कंपनी नागपूर येथे विस्तार करीत आहे. या अत्याधुनिक संरक्षण व एरोस्पेस उत्पादन प्रकल्पासाठी अटी व शर्तीनुसार मिहानतर्फे २२३ एकर जागेचे हस्तांतरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. रामगिरी निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात मिहान प्रकल्पातील वैशिष्ट्यपूर्ण ठरणाऱ्या या प्रकल्पासाठी जमिनीचे हस्तांतरण मुख्यमंत्री फडणवीस …
Read More »सचिन सावंत यांचा आरोप, मोदी-फडणवीसांकडून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक सोयाबीनला प्रति क्विंटल ६,००० रुपये हमीभावाची मागणी करणारे फडणवीस सत्तेत असूनही भाव का देत नाहीत ?
मोदी सरकारने या वर्षी सोयाबीनसाठी केवळ ५३२८ रुपये प्रति क्विंटल इतका हमीभाव जाहीर केला आहे. परंतु २०१३ साली भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी दिंडी काढून सोयाबीनला ६,००० रुपये हमीभाव देण्याची मागणी केली होती. त्या दिंडीला आज १२ वर्षे झाली, आणि मोदी सरकार सत्तेत येऊन ११ वर्षे उलटली तरीही …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचे दिवाळीचे ३ दिवस सातपुडा पर्वतरांगातील आदिवासींसोबत स्वतः जेवण बनवले, आदिवासींसोबतच मुक्काम, कपड्यांचे वाटप व आरोग्य कॅम्पचे आयोजन
दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा, असे या सणाचे वर्णन केले जात असले तरी आजही समाजातील लाखो लोक या सण, उत्सवापासून वंचित आहेत. आपण दिवाळीचा आनंद आपल्या कुटुंब व मित्रपरिवारासह साजरा करतो पण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासाठी दिवाळी म्हणजे केवळ सण नसून माणसांमधील नाळ अधिक घट्ट …
Read More »दिवाळीचा गोडवा जपत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भाऊबीज एकत्र भाऊबीज निमित्त ठाकरे कुटुंबिय एकोप्याने साजरा केला
महाराष्ट्राच्या राजकारणा ठाकरे कुंटुंबियाचे अनन्य साधारण महत्व आहे. त्या ठाकरे कुटुंबियांमधील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र यावे म्हणून राज्यातील ठाकरे प्रेमींची इच्छा होती. तसेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे राजकियदृष्ट्या एकत्र येत तशी घोषणाही केली. त्याचबरोबर आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर तशी अधिकृत …
Read More »एकनाथ शिंदे यांचे मत, आरएसएसवर बंदी घालण्याचे वक्तव्य दुर्दैवी संघ नेहमी राष्ट्रसेवेसाठी तत्पर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक कडवट देशभक्त आणि राष्ट्रभक्त संघटना आहे. देशावर संकट कोसळले की आरएसएस नेहमी मदतीसाठी पुढे सरसावते. आरएसएसवर बंदी घालण्याबाबतचे वक्तव्य हे दुर्दैवी आणि निषेधार्ह असल्याचे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. ते ठाणे येथे पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. स्वबळावर निवडणुका लढवण्याची घोषणा करणाऱ्या …
Read More »आशिष शेलार यांची माहिती, ३६५ दिवसात १२०० पेक्षा जास्त सांस्कृतिक कार्यक्रम आशा भोसले व सुधीर फडके यांच्या बहारदार गीतांची "दीप उत्सव दिवाळी पहाट"
राज्यभर ३६५ दिवसांत १२०० पेक्षा अधिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा जनमानसात पोहोचविण्यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केले. आशिष शेलार पुढे बोलताना म्हणाले की, सांस्कृतिक कार्य विभागाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय, …
Read More »एकनाथ शिंदे म्हणाले की, दिवाळीचा दीपोत्सव महाराष्ट्राच्या गौरवशाली वाटचालीस नवी दिशा देणारा ठरो दिवाळी बळीराजाच्या आयुष्यात पुन्हा चांगले दिवस घेऊन येवो
दीपोत्सव राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनात सुख, समृद्धी आणि नवी ऊर्जा घेऊन येवो, अशा शुभेच्छा देतानाच दीपोत्सवाचा हा प्रकाश महाराष्ट्राच्या विकासाचा मार्ग उजळेल अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला दीपावलीच्या मंगलमय पर्वाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले की, “दिवाळी हा केवळ दिव्यांचा नाही, तर …
Read More »औरंगाबादमध्ये आरएसएस कार्यालयावर मोर्चा निघणारच; वंचित बहुजन आघाडीची ठाम भूमिका पोलिस प्रशासनाला दोन पर्याय
वंचित बहुजन आघाडीने आरएसएस अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा केल्यानंतर पोलिस प्रशासनाने या मोर्चाचे ठिकाण बदलण्याची विनंती करत, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढावा असा प्रस्ताव दिला आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाचा हा प्रस्ताव ठामपणे फेटाळला आहे. औरंगाबाद पोलीस प्रशासनाने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांना संपर्क …
Read More »आमदार रईस शेख यांनी परिवहन विभागाला अॅग्रीगेटर्स मसुदा नियमांमध्ये सुचवल्या सुधारणा कामाचे तास चालकांच्या उत्पन्नासाठी वाढवा, प्रवाशांना राईड रद्द करण्यासाठी ठराविक कालावधी द्यावा
चालकांना इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) रूपांतरण खर्चावर २५ टक्के अनुदान असावे आणि त्याचा पुरवठा चालक कल्याण निधीतून करावा, अशी सूचना समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी मोटार वाहन अॅग्रीगेटर्स नियम, २०२५ च्या मसुद्यावर राज्य परिवहन विभागाला पत्र लिहून केली आहे. परिवहन विभागाने ९ ऑक्टोबर रोजी यासंदर्भामला मसुदा नियम प्रकाशित …
Read More »पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून पोलीस हुतात्म्यांना अभिवादन शहिद १९१ पोलिसांना केले विनम्र अभिवादन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षभरात संपूर्ण देशात शहीद झालेल्या पोलीस हुतात्म्यांना नायगाव पोलीस मुख्यालय येथील पोलीस स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, विविध देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत व प्रतिनिधी, वरिष्ठ पोलीस अधिकारी व निमंत्रित …
Read More »
Marathi e-Batmya