राजकारण

२०२४ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अद्याप जाहिर नाही आरटीआय खालील अर्जाला महाराष्ट्र शासनाची माहिती

महाराष्ट्र शासनाने अद्याप सन २०२४ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार घोषित केलेला नाही, अशी माहिती राज्य सरकारने दिली. यासंदर्भात २०२४ च्या महाराष्ट्रभूषण पुरस्काराबाबत माहिती अधिकारातून माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी अर्ज दाखल केला. त्यास दिलेल्या उत्तरात राज्य सरकारने वरील माहितील दिली. अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकाराखाली विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना …

Read More »

काँग्रेस विधिमंडळ पदाधिका-यांच्या नियुक्त्या जाहीर: अमित देशमुखांवर जबाबदारी विधानसभा उप नेते पदी आ. अमिन पटेल, सचिवपदी आ. डॉ. विश्वजित कदम, विधानपरिषदेत गट नेतेपदी आ. सतेज पाटील

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मान्यतेने काँग्रेस विधिमंडळ पक्ष पदाधिका-यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. विधानसभेतील काँग्रेसच्या उपनेतेपदी आ. अमीन पटेल यांची, मुख्य प्रतोदपदी माजी मंत्री आ. अमित देशमुख यांची, सचिव पदी आ. डॉ. विश्वजीत कदम यांची आणि प्रतोदपदी शिरीषकुमार नाईक व संजय मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आलेली …

Read More »

पेट्रोलपंप उभारणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘एक खिडकी’; २००० हजार पंपाचे नियोजन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

राज्यातील १६६० पेट्रोलपंपांच्या परवानग्या देण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ एक खिडकी ‘ सुरू करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक खिडकी सुरू करण्याची महत्त्वपूर्ण सूचना महसूल विभागाला केली आहे, असे सांगून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राज्यात याद्वारे मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती …

Read More »

ग्रामीण भागातील रस्ते व शाळांच्या विकासासाठी न्यु डेव्हलपमेंट बँकेचे सहकार्य बँकेच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा

न्यू डेव्हलपमेंट बँकेचे भारतीय प्रादेशिक कार्यालयाचे महासंचालक डॉ डी.जे पांडियन यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथिगृह येथे भेट घेतली. या भेटी दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बँकेच्या शिष्टमंडळांसोबत विविध क्षेत्रातील सहकार्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. राज्यात ग्रामीण भागामध्ये सिमेंट काँक्रीटचे दर्जेदार रस्ते, अन्य महामार्गाचे जाळे विकसित करण्यासाठी आणि शाळांच्या सर्वांगीण …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, राज्यात १४ खाणी सुरू करून महसूल वाढवण्यावर भर केंद्र शासनाचे खनिकर्म विभागाला सर्वतोपरी सहकार्य - केंद्रीय खनिकर्म मंत्री जी. किशन रेड्डी

केंद्र शासनाकडून खनिकर्म विभागाला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही देत राज्यातील खाणपट्टे सुरु करावेत असे निर्देश केंद्रीय खनिकर्म मंत्री जी. किशन रेड्डी यांनी दिले. राज्यातील खनिकर्म विभागासाठी पर्यावरण, महसूल, भूसंपादन व वन विभागातील  प्रलंबित कामे फास्ट ट्रॅक वर घेवून राज्यात १४ खाणी सुरू करून महसूल वाढवण्यावर भर देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

अनिल देशमुख यांचा सवाल, “शक्ती” कायदा कधी अमलात आणणार? स्वारगेट येथील बलात्काराच्या घटनेनंतर केला सवाल

राज्यात महिला व तरुणीवर होणारा अत्याचार कमी होण्यासाठी आंध प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात शक्ती कायदा आनण्यासाठी मी गृहमंत्री असतांना प्रयत्न केले. या कायद्यात अत्याचाऱ्याला थेट फाशीच्या शिक्षेची तरतुद करण्यात आली आहे. यानंतर या कायद्याला विधानपरिषद व विधानसभेची मंजुरी करुन अंतीम मंजुरीसाठी चार वर्षापुर्वी तो केंद्र सरकारला पाठविण्यात आला. परंतु अद्यापही त्या …

Read More »

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नी या दोन मंत्र्यांची नोडल म्हणून नियुक्ती मंत्री चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई यांच्यावर जबाबदारी

गेली अनेक वर्षे रखडलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावर मार्ग काढण्यासाठी गतवर्षी कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री एस आर बोम्मई आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती झालेल्या बैठकीत दोन्ही बाजूच्या मंत्र्याचा समावेश असलेली समिती स्थापन करून त्या माध्यमातून सीमा प्रश्नावर मार्ग काढावा अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत तोडगा …

Read More »

राज्यातील खनिज संपत्तीचे प्रभावी व्यवस्थापन करा केंद्रीय खनिकर्म सचिव व्ही. एल.कांथा राव यांची सूचना

महाराष्ट्र शासनाच्या खनिकर्म विभागाचे काम उत्कृष्ट असून मार्चपर्यंत विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील एक खाण नव्याने कार्यरत होणार असून आगामी वर्षात विदर्भातील सात नवीन खाणी सुरू होतील राज्यातील खनिज संपत्तीचे प्रभावी व्यवस्थापन आणि लिलाव प्रक्रियेनंतरची सर्व अंमलबजावणी विहित वेळेत पूर्ण करा, असे निर्देश केंद्रीय खाण मंत्रालयाचे सचिव व्ही. एल.  कांथा राव यांनी …

Read More »

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एमटीडीसीकडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (MTDC) आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून राज्यातील महिला पर्यटकांसाठी  १ ते ८ मार्च २०२५ या कालावधीत एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमध्ये ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. या सवलतीसह विविध पर्यटन उपक्रम देखील राबविण्यात येणार आहेत. “आई” महिला केंद्रित/लिंग समावेशक पर्यटन धोरणांतर्गत हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, वाहनधारकांची लूट थांबवा इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात हायसेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटसाठी तिप्पट शुल्क का? जीएसटी का लपवला? सवाल

भारतीय जनता पक्षाचे सरकार जनतेची लूट करण्याची एकही संधी सोडत नाही. जनता आधीच महागाईने त्रस्त असताना आता वाहनधारकांच्या खिशावर सरकारची नजर पडली आहे. वाहनांच्या हायसेक्युरिटी नंबर प्लेटच्या नावाखाली भरमसाठ शुल्क आकारले जात आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील दर दुपटीपेक्षा जास्त असून हे शुल्क नाही तर ‘जिझिया’ करच आहे असा आरोप …

Read More »